Home गडचिरोली सर्वीस रोड करीता अतिक्रमण हटावा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी

सर्वीस रोड करीता अतिक्रमण हटावा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी

106

आशाताई बच्छाव

IMG_20240317_082159.jpg

 

सर्वीस रोड करीता अतिक्रमण हटावा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी

गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ: शहरातून बांधण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वीस रोडचे बांधकाम करण्यासाठी नगर परिषद हद्दीतील बांधकामे आणि अतिक्रमणे हटविण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.

गडचिरोली शहराच्या विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या सर्वीस रोडच्या जागेवर राष्ट्रीय महामार्गालगत प्रस्थापितांनी व व्यापाऱ्यांनी मनमानी पद्धतीने पक्के बांधकाम केलेले आहेत. यामुळे शहरात महामार्गाचे बांधकाम झाल्यानंतरही नागरिकांकरीता सर्वीस रोडचे बांधकाम होवू शकलेले. तसेच मोठे व्यापारी व प्रस्थापितांच्या दबावामुळे लोकप्रतिनिधींनी याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याचे शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.

शहरातील महामार्गावरील अवजड वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर येवून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने नगर परिषद हद्दीतील सर्वीस रोड व इतर आरक्षित जागांवरील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे हटविणे गरजेचे असतांनाही त्याठिकाणी बेकायदेशीरपणे जाहिरात फलक, होर्डींग्ज आणि अनधिकृत बांधकामे उभी राहिली असून आरक्षित आणि सर्वीस रोडवरील जागांवरील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे आणि बेकायदेशीर जाहिरात फलक, होर्डींग्ज व इतर सर्व प्रकारचे अतिक्रमण नगर परिषद प्रशासनाने हटविण्याची कारवाई करावी, अशी मागणीही शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.

Previous articleसौ उमा (जयश्री) चव्हाण यांना स्त्री सन्मान पुरस्कार जाहीर
Next articleजिल्हाधिकारी संजय मिणा यांच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार : शेकापच्या जयश्रीताई जराते यांचा इशारा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.