Home नाशिक सौ उमा (जयश्री) चव्हाण यांना स्त्री सन्मान पुरस्कार जाहीर

सौ उमा (जयश्री) चव्हाण यांना स्त्री सन्मान पुरस्कार जाहीर

155

आशाताई बच्छाव

IMG_20240317_081825.jpg

सौ उमा (जयश्री) चव्हाण यांना स्त्री सन्मान पुरस्कार जाहीर

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे

रयत शिक्षण संस्थेच्या वनसगाव तालुका निफाड येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या आदर्श शिक्षिका सौ उमा (जयश्री) अर्जुन चव्हाण यांना शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेद्वारा श्री सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे अशी माहिती शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना आयोजक समितीने दिली आहे.
सौ उमा (जयश्री) चव्हाण टाकळी विंचूर यांना शैक्षणिक, सामाजिक ,सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या द्वारा त्यांना श्री सन्मान 2024 पुरस्कार जाहीर झाला असून तापडिया रंगमंदिर छत्रपती संभाजीनगर येथे पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेने द्वारा सन्मान पुरस्कार २०२४ चे प्रेरणा स्थानी मा ना एकनाथजी शिंदे साहेब (मुख्यमंत्री, महाराष्ट्र) असून मार्गदर्शक म्हणून संसदरत्न डॉ. श्री. श्रीकांतजी शिंदे साहेब (खासदार, कल्याण लोकसभा) तर पुरस्कार वितरण सोहळा पुढील मान्यवरांच्या शुभहस्ते होणार आहे.मा.डॉ. निलमताई गो-हे उप सभापती, विधानपरिषद महाराष्ट्र व नेत्या, शिवसेना
श्रद्धेय मा.श्री. चंद्रकांतजी राठी वरिष्ठ आध्यात्मिक मार्गदर्शक आर्ट ऑफ लिविंग मा. सौ. शितलताई म्हात्रे शिवसेना उपनेत्या प्रवक्ता कार्यक्रम आयोजक अक्षय महाराज भोसले प्रदेशाध्यक्ष शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना, प्रभंजन महातोले, निलेश गाढवे सह अध्यक्ष, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना पुष्कर महाराज गोसावी उपाध्यक्ष, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना सहयोगी संस्था ,नोंद : पुरस्कार सोहळ्यानंतर स्त्री शक्ती वरील सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण होणार आहे.