Home नाशिक धर्म ध्वज हे शांती, एकात्मता व मांगल्याचे प्रतीक वनसगावला धर्म ध्वजारोहण प्रसंगी...

धर्म ध्वज हे शांती, एकात्मता व मांगल्याचे प्रतीक वनसगावला धर्म ध्वजारोहण प्रसंगी वैराग्यमूर्ती तुकाराम बाबा जेऊरकर यांचे प्रतिपादन

34
0

आशाताई बच्छाव

IMG_20240317_081231.jpg

धर्म ध्वज हे शांती, एकात्मता व मांगल्याचे प्रतीक

वनसगावला धर्म ध्वजारोहण प्रसंगी वैराग्यमूर्ती तुकाराम बाबा जेऊरकर यांचे प्रतिपादन

दैनिक युवा मराठा महासंघ
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे

वनसगाव तालुका निफाड येथे २६ मार्चपासून संपन्न होत असलेल्या सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहाचे धर्म ध्वजपूजन व धर्म ध्वजारोहण वैराग्यमूर्ती तुकाराम बाबा जेऊरकर यांच्या शुभहस्ते मंगलमय वातावरणात संपन्न झाली असल्याची माहिती सप्ताह समिती प्रसिद्धीप्रमुख रामभाऊ आवारे यांनी दिली आहे.
धर्म ध्वज शांतता एकात्मता पावित्र्यता व मांगल्याचे प्रतिक असून सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह निमित्त वनसगाव येथे होणाऱ्या या ज्ञानयज्ञ सोहळ्यासाठी समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ सप्ताह समिती व विविध समित्यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात धर्म ध्वज पूजन व धर्म ध्वजारोहण सोहळा मंगलमय वातावरणात संपन्न करून आदर्श निर्माण केला आहे असे प्रतिपादन प्रति संत खानदेश रत्न वैराग्यमूर्ती तुकाराम बाबा जेऊरकर यांनी मार्गदर्शन करताना आपले अमृत बोल केले आहे.
सर्वप्रथम शिवालय विश्वनाथ मंदिरापासून भजनी मंडळ कलशधारी महिला तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला तरुण मित्र मंडळ व सत्ता कमिटीतील सदस्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात सप्ताह स्थळी उभारण्यात आलेल्या ध्वजाकडे मार्गक्रमण केले. यावेळी माजी सरपंच उन्मेष डुंबरे व सौ वैशाली डुंबरे तसेच काशिनाथ पाटील शिंदे व सौ ज्योती शिंदे यांच्या व इतर महिलांच्या हस्ते आदरणीय बाबांचे औक्षण करण्यात आले प्रसंगी बाबांचे शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ व पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. धर्म ध्वजाच्या रांगोळी व सजावट कु संस्कृती शिंदे ,कु ऋतुजा काळे, सौ

यानंतर आदरणीय बाबांच्या शुभहस्ते सप्ताह स्थळी उभारण्यात आलेल्या ध्वजाचे ध्वजपूजन, ध्वजारोहण व हिंदू धर्मात पवित्र मांडल्या जाणाऱ्या गाईची बाबांच्या शुभहस्ते पूजन करण्यात आले. यावेळी संत महंत वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार व भाविक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
यावेळी अद्याप पावतो सप्ताहासाठी विशेष योगदान देणाऱ्या वैकुंठवासी मान्यवरांच्या नामोल्लेख करून जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला .यानंतर ध्वजारोहण कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले
वैराग्यमूर्ती दत्तप्रसाद बाबा खडक माळेगाव, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे नासिक जिल्हाध्यक्ष ह भ प धर्माचारी ह भ प निवृत्ती बाबा रायते खडक माळेगाव वारकरी भूषण ह भ प समाधान महाराज पगार आळंदी भागवताचार्य ह भ प कल्याणी ताई निकम थेटाळे , माजी सभापती सेवा पाटील सुरासी वे शा पा दत्ताशास्त्री गव्हाले, ह भ प बाळासाहेब महाराज शिरसाठ कोटमगाव,मृदंगाचार्य हभप मंगेश महाराज निकम नांदुर्डी, ह भ प अभिजीत डुकरे आदींचा समस्त ग्रामस्थ व सप्ताह समितीच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी वारकरी भुषण ह भ प समाधान महाराज पगार आळंदी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, सप्ताहासाठी तयार करण्यात आलेल्या समित्या केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात कृतीत आणून पुण्य कार्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच धर्माचार्य हभप निवृत्ती बाबा रायते यांनी सांगितले की ,धर्म कार्यासाठी आपण तन-मन-धनाने एकत्र येऊन हा धर्म यज्ञ सोहळा उत्कृष्ट पद्धतीने कसा करता येईल यासाठी सर्व सदस्य तरुण वर्ग व भाविकांनी एकत्र येऊन सहभागी होण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच मा सभापती शिवा पाटील सुरासे यांनी या सप्ताहासाठी आमचे सर्व तरुण मित्र मंडळ सर्वतोपरी आपणास सहकार्य करणार असून आमचे नेहमीच सहकार्य असेल असे अभिवचन दिले. वैराग्यमूर्ती तुकाराम बाबा जेऊरकर यांचा गणेश कृषी सेवांचे संचालक तथा जय बाबाजी भक्त परिवाराचे सदस्य जगन्नाथ शिवराम आहेर यांच्या शुभहस्ते संत पूजन करण्यात आले.यावेळी गणेश पूजनासाठी बसलेल्या सापत्निक जोड्यांचा धर्माचार्य हभप निवृत्ती बाबा रायते व वारकरी भूषण ह भ प समाधान महाराज पगार (माऊली) यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. शेवटी आरती व प्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी सारोळे खुर्द भजनी मंडळ, खडक माळेगाव भजनी मंडळ तसेच उगाव ,खेडे ,शिवडी ,थेटाळे, रानवड पालखेड, खडक माळेगाव, वनसगाव सह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleअनाथ व वृद्धांची माय सौ संगीता माई गुंजाळ लोकमत नाशिक मोस्ट पावरफुल वुमन पुरस्काराने सन्मानित
Next articleसौ उमा (जयश्री) चव्हाण यांना स्त्री सन्मान पुरस्कार जाहीर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here