Home विदर्भ स्वाभिमानीच्या लढ्याला एक वर्षानंतर यश. जळगाव संग्रामपूर शेगाव तालुक्याला मिळणार ६४ कोटी...

स्वाभिमानीच्या लढ्याला एक वर्षानंतर यश. जळगाव संग्रामपूर शेगाव तालुक्याला मिळणार ६४ कोटी ७ लक्ष.

197
0

राजेंद्र पाटील राऊत

स्वाभिमानीच्या लढ्याला एक वर्षानंतर यश.
जळगाव संग्रामपूर शेगाव तालुक्याला मिळणार ६४ कोटी ७ लक्ष.
प्रतिनिधी :- स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज नेटवर्क बुलढाणा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पिक विमा मागणीचा लढा सुरू ठेवल्याने रिलायन्स विमा कंपनीने दखल घेत ६४ कोटी ७ लाख २१ हजार भरपाई रक्कम मंजूर केली. तसे कार्यालयीन पत्र विमा कंपनीने दिल्याची माहिती आज स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी दिली. यासाठी खासदार राजू शेट्टी माननीय आमदार देवेंद्र भुयार यांनी भरीव सहकार्य केल्याचे त्यांनी बोलतांना सांगितले ही रक्कम तीन तालुक्यातील ४७५९९ शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे रिलायन्स कंपनीच्या कार्यालयीन पत्रात नमूद आहे. ही रक्कम मंडळ निहाय वाटप करण्यात येईल. सर्वाधिक रक्कम वडशिंगी सर्कल तर सर्वात कमी रक्कम सोनाळा सर्कलसाठी मंजूर करण्यात आली. सर्कल निहाय मंजूर करण्यात आलेली रक्कम व शेतकरी पुढीलप्रमाणे यात संग्रामपुर तालुका बावनबीर ३ कोटी ९९ लाख १ हजार रु. (शेतकरी ५४४२) कवठळ १५ कोटी ७६ लाख ६१ हजार रु.(शेतकरी ५०४२) पातुर्डा ९ कोटी ७१ लाख १ हजार (शेतकरी ४६३३) संग्रामपूर सर्कल ७ कोटी ८४ लाख ८३ हजार (शेतकरी ६६३६) सोनाळा सर्कल ६९ हजार रूपये (शेतकरी १५) शेगाव तालुका जंलब सर्कल ६ लाख ६५ हजार रूपये (शेतकरी ७०) जवळा बु. १७ लाख ५२ हजार रुपये (शेतकरी ५००) मनसगाव ४८ लाख १९ हजार रुपये (शेतकरी ३७२९) माटरगाव सर्कल ३ कोटी ८४ लाख २ हजार (शेतकरी ३४६६) शेगाव सर्कल २७ लाख ३१ हजार रुपये (शेतकरी ५१५) याप्रमाणे ६४ कोटी ७ लाख २१ हजार रुपये विमा भरपाई मिळणार आहे. जळगाव तालुक्यातील आसलगाव सर्कल १ कोटी ५९ लाख ७२ हजार रुपये (शेतकरी ३७३२) जळगाव सर्कल ३ लाख ४० हजार रुपये ( शेतकरी १६२ ) जामोद २ कोटी १२ लाख ८ हजार (शेतकरी ४१६६) पिंपळगाव काळे ९९ लाख ९३ हजार (शेतकरी २८२२) वडसींगी सर्कल १७ कोटी १५ लाख ६५ हजार (शेतकरी ६६५९) आज दुपारी संग्रामपूर येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसह काही शेतकऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवुन आनंद व्यक्त केला.
जे शेतकरी वंचित राहिले त्यांच्यासाठी लढा यापुढेही सुरूच ठेवणार असल्याचे प्रशांत डिक्कर यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितले. गेल्या एक वर्षापासून स्वाभिमानीने सर्व राजकीय अडथळ्यांवर मात करत लढा सुरूच ठेवल्याने रिलायन्स कंपनीला अखेर ही विमा भरपाई द्यावी लागली. यासाठी संघटनेचे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी आमदार देवेंद्र भुयार पुजाताई मोरे गजानन पाटील बंगाळे यांचे भरीव सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले‌. पिक विमा नुकसान भरपाई साठी अनेक राजकीय पक्षांसह काही स्वयंसेवी संघटनांनी ही निवेदने दिली होती. पण स्वाभिमानीने हा लढा अखेर पर्यंत लढायची चिकाटी सोडली नसल्याने स्वाभिमानीच्या प्रयत्नाला यश मिळाले. कोरोणाचा काळ असूनही स्वाभिमानीने शेगाव, संग्रामपूर, जळगाव येथे हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोर्चे काढले. अंगावर गुन्हे दाखल करून घेतले. पन्नास वेळा वरीष्टांशी पत्रव्यवहार केला.विमा प्रश्नावर लोकप्रतिनिधी बोलत नसल्याने अखेर एक महिन्यापूर्वी मुंबई पावसाळी अधिवेशनात विधानभवन समोर आंदोलन केले. पुणे येथे जाऊन कृषी आयुक्त कार्यालय समोर दोन दिवस प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण झाले. या उपोषणाच्या वेळी ना.कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन या आंदोलनाची गंभीरतेने दखल घेतली या सर्व आंदोलनाचा परिपाक म्हणून रिलायन्स कंपनीने ही रक्कम मंजूर केली व स्वाभिमानीच्या लढ्याला अखेर यश मिळाल्याने शेतकरी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करत आहेत.

Previous articleकोरोना लसीकरण पुर्ण करून, शाळा सुरू करा :आमदार चंद्रकांत जाधव
Next articleमेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राला लहुजी साळवे यांची प्रतिमा भेट डॉ निलेश जामकर यांचा सत्कार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here