Home विदर्भ मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राला लहुजी साळवे यांची प्रतिमा भेट डॉ निलेश जामकर...

मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राला लहुजी साळवे यांची प्रतिमा भेट डॉ निलेश जामकर यांचा सत्कार

148
0

राजेंद्र पाटील राऊत

मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राला लहुजी साळवे यांची प्रतिमा भेट

डॉ निलेश जामकर यांचा सत्कार

मालेगाव तालुका प्रतिनिधी प्रकाश भुरे : युवा मराठा न्युज नेटवर्क विदर्भ
मेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला सर्पमित्र राजु साठे यांच्या वतीने वस्ताद लहुजी साळवे यांची प्रतिमा आयोजित कार्यक्रमात भेट देण्यात आली.
मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले वैदयकीय अधिकारी डॉ निलेश जामकर रुजू झाल्यापासून त्यांनी केंद्रात शिस्तप्रिय वातावरण निर्माण केले आहे.गोरगरीब रुग्णावर योग्य औषोधोपचार करीत आहेत.रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून त्यांनी अनेक रुग्णांना ठणठणीत बरे केले आहे.अनेक सापांना जीवनदान देणारे राजु चंद्रकांत साठे यांना सर्पदंश झाला असता त्याच्यावर योग्य औषोधोपचार करून जीवनदान दिले आहे.त्याच्या कार्याची दखल घेत ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन पंचायत समिती सदस्य कौशल्याबाई साठे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.कार्यक्रमाला सत्कारमुर्ती वैदयकीय अधिकारी डॉ निलेश जामकर, वैदयकीय अधिकारी काळे, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेदेव साठे,माजी तंटामुक्ती अध्यक्ष शौकत पठाण ,माजी तंटामुक्ती अध्यक्ष विनोद तायडे, माजी सैनिक चंद्रकांत साठे,आदींची प्रमुख उपस्थिती होती. पंचायत समिती सदस्या कौशल्याबाई साठे यांच्या हस्ते डॉ निलेश जामकर यांचा शाल ,पुष्पहार,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आली.याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वस्ताद लहुजी साळवे यांची प्रतिमा भेट देण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला अनिल साठे,अमित साठे,गोपाल साठे, सुनील साठे,विक्की साठे,राजेश साठे,रणजित साठे आदीसह प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्याची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे सूत्र संचालन ज्ञानदेव साठे यांनी करून आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here