Home नाशिक अनाथ व वृद्धांची माय सौ संगीता माई गुंजाळ लोकमत नाशिक मोस्ट पावरफुल...

अनाथ व वृद्धांची माय सौ संगीता माई गुंजाळ लोकमत नाशिक मोस्ट पावरफुल वुमन पुरस्काराने सन्मानित

215
0

आशाताई बच्छाव

IMG_20240317_080936.jpg

अनाथ व वृद्धांची माय सौ संगीता माई गुंजाळ लोकमत नाशिक मोस्ट पावरफुल वुमन पुरस्काराने सन्मानित

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

लोकमत नाशिक मोस्ट पाॅवरफुल वूमन नामांकित पुरस्कार अवघ्या महाराष्ट्रात अनाथाची व वृध्दाची माय ही उपाधी मिळविलेल्या पिंपळगाव नजिक (लासलगाव) येथिल जय जनार्दन अनाथ व वृध्दाची माय सौ संगितामाई दिलीप गुंजाळ याना सुप्रसिध्द अभिनेञी आसावरी जोशी , पुर्णब्रम्हा या महाराष्ट्रीयन रेस्टाॅरंट चेनच्या संस्थापिका बैगलोंर जंयती कठाळे आणि नाशिकचे पोलीस आयुक्त संदिप कर्णिक याच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कृतिशील कर्तुत्वाने कार्य करून शेकडो अनाथांच्या जीवनात सुखी संसाराची हिरवळ निर्माण करणार्या महाराष्ट्रातील नामवंत महिला किर्तनकार आणि प्रवचनकार हभप सौ संगितामाई दिलीप गुंजाळ याना हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे
सौ संगिताताई गुंजाळ यांना हा मानाचा व सन्मानाचा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आल्याबद्दल सर्व स्तरातुन मनःपुर्वक हार्दिक अभिनंदन करण्यात आले. लासलगाव येथिल लोकमतचे जेष्ठ पञकार शेखर देसा॓ई यानी अनाथांची व वृध्दांची सेवा संगितामाई गुंजाळ करतात म्हणुन निवड केली. माईचे आज पर्यतचे कार्य [104] अनाथ मुंलीचे विवाह लावून संसार थाटुन दिले तर [60] अनाथ मुंलाचे विवाह लावून संसार थाटुन दिले आहे. अनाथाची सेवा बेवारस वृध्दांची सेवा व गोसेवेचे फळ किवा पावती शाबासकीची थाप लोकमत मीडीया ग्रुपच्या वतीने पुरस्कार रूपाने माईना देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here