Home नाशिक समाजात नवलौकिक मिळविण्यासाठी काहीतरी वेगळे करून दाखवणे गरजेचे

समाजात नवलौकिक मिळविण्यासाठी काहीतरी वेगळे करून दाखवणे गरजेचे

28
0

आशाताई बच्छाव

IMG_20240317_080556.jpg

समाजात नवलौकिक मिळविण्यासाठी काहीतरी वेगळे करून दाखवणे गरजेचे

ह भ प सौरभ महाराज जाधव कुंडाणेकर यांचे कीर्तनातून प्रबोधन

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

मृत्यू लोकात जी लोक जन्माला आली ती प्रसिद्धीसाठी धडपडत असतात. मला मोलाचे व मानाचे स्थान मिळाले पाहिजे.या भावनिकतेने कार्य करत असतात.आपल्याला नावलौकिक मिळवायचा असेल तर समाजात काही तरी नवीन व वेगळे केले पाहिजे.पंढरीश पांडुरंग परमात्मा जगाच्या कल्याणासाठी व तुमचं आमचं संरक्षण व कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी २८ युगांपासून कटेवर हात ठेवून उभा आहे असे सुंदर विचार हभप सौरभ महाराज जाधव यांनी व्यक्त केले आहे.
एक रोटी तालुका चांदवड येथे आयोजित कै फकिरराव गणपत धनाईत यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त आयोजित कार्यक्रमात ते संत तुकोबारायांच्या अभंगावर चिंतन मांडताना बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, आपला नावलौकिक बाबा आपल्याला लोकांनी चांगले म्हणावे आपला मान सन्मान व्हावा यासाठी व्यक्ती ही रात्रंदिवस प्रयत्न करत असते.परंतु लोकांपेक्षा आपण वेगळे केले पाहिजे तेव्हा नावलौकिक मिळवता येतो.चुकीच्या पद्धतीने न वागता प्रसिद्ध झाले पाहिजे.भगवान परमात्म्याने इतरांपेक्षा वेगळे केले म्हणून प्रसिद्ध झाले आहे .
सेवितो हा रस वाटीतो आणिका!
घ्या रे होऊ नका रानभरी!!
या संत तुकोबारायांच्या अभंगावर चिंतन करताना त्यांनी या अभंगाद्वारे दातृत्वाची उंची कशा पद्धतीने वाढवता येते किंवा वाढवली पाहिजे यावर सखोल मार्गदर्शन केले.
देवाधिकांची वेगळेपण सांगताना त्यांनी सांगितले की, श्री कृष्णाने १६ सहस्त्र नारी भोगुन ब्रह्मचारी असे वेगळेपण जपले आहे.संसार भोगत असताना एखादी व्यक्ती वेगळं कार्य करत असतो तसेच त्याच्यात असलेल्या गुणांचा योग्य रीतीने वापर करून तो समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य करत असतो.माणसाची प्रसिद्धी कुठपर्यंत,तर देवाची प्रसिध्दी आहे तोपर्यंतच माणसाची प्रसिद्धी असते.देवाची प्रसिद्धी ही संताची प्रसिद्ध आहे तो पर्यत असते.संत हे देवा पेक्षा काकणभर प्रसिद्ध झाले कारण संतांची समाजाला देण्याची वृत्ती होती.स्वतः साठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करतो.आपण धन साठवलं पण तुकाराम महाराज यांनी समाजाला वाटुन दिले. अर्जुनाला श्री कृष्णा ने गीता दिली.पण अर्जुनाने कोणाला सांगितले नाही.गीता संत ज्ञानेश्वर महाराज यांनी संस्कृत मधुन मराठीत केली.गीता कळावी म्हणून समाजाला सांगितली म्हणून ते प्रसिद्ध झाले.म्हणुन आज ही समाधी सोहळा उत्साहात साजरा–केला जातो… देवांच्या पुढे एक पाऊल पुढे संत आहे म्हणून प्रसिद्ध झाले.अनुभव हा महत्वाचा आहे– अनुभव नसेल तर त्या कामात लक्षच देऊ नये. पांडुरंग सर्वात श्रेष्ठ आहे. २८ युगांपासून एका ठिकाणी पांडुरंग परमात्मा- तुमचे – आमचे –रक्षण व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उभा आहे. भगवान परमात्मा सुखकर आहे.तुकोबांनी आपल्या सुखासाठी विनवणी केली आहे.
अशा पद्धतीने त्यांनी अभंगाचे चिंतन मांडताना विविध उदाहरणे, दाखले, प्रमाण, सिद्धांत देऊन उपस्थित त्यांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी गायनाची साथ हभप अक्षय महाराज वाघ,हभप सोपान महाराज,हभप योगेश महाराज जाधव यांनी केली तर मृदंगाची साथ हभप रमेश महाराज गांगुर्डे , रवि महाराज – विणेकरी म्हणून साथ दिली.

Previous articleशिवसंग्रामच्या ज्योतीताई मेटे बीड लोकसभेसाठी इच्छुक
Next articleअनाथ व वृद्धांची माय सौ संगीता माई गुंजाळ लोकमत नाशिक मोस्ट पावरफुल वुमन पुरस्काराने सन्मानित
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here