Home नाशिक आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून नागापूर एकलव्य वस्तीवरील आदिवासी बांधवांना रेशन...

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून नागापूर एकलव्य वस्तीवरील आदिवासी बांधवांना रेशन कार्डचे वाटप करण्यात आले.

99
0

आशाताई बच्छाव

IMG-20220828-WA0046.jpg

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून नागापूर एकलव्य वस्तीवरील आदिवासी बांधवांना रेशन कार्डचे वाटप करण्यात आले.
नांदगांव प्रतिनिधी अनिल धामणे
वर्षानु वर्ष रेशनकार्ड पासून वंचित असलेल्या आदिवासी वस्त्यांवरील कुटुंबांना घरपोच निशुल्क रेशन कार्ड उपलब्ध करून देण्याची मोहीम आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून निरंतर सुरू आहे.
आज नागापूर तालुका नांदगाव येथील एकलव्य नगर पाची पुल वस्तीवरील 70 कुटुंबीयांना रेशन कार्ड ( शिधा पत्रिका) चे वाटप करण्यात आले.
अनेक वर्षांपासून रेशन कार्ड पासून वंचित असलेल्या आदिवासी समाज बांधव या वेळी आनंदाने भारावून गेला होता. कुटुंबातील प्रत्येक सदस्य रेशन कार्ड हातात घेऊन कुतूहलाने आनंदित होऊन पाहत होता.
आमदारांच्या माध्यमातून आज आपण रेशन कार्ड धारक झालो याचा आनंद त्यांच्या डोळ्यातून स्पष्ट जाणवत होता.
शिवसेनेचे आदिवासी समाज संघटक भाऊराव भाऊ बागुल यांनी गेल्या महिन्याभरापासून सर्व आदिवासी बांधवांचे कागदपत्र जमा करून रीतसर पाठपुरावा करून रेशन कार्ड तयार करून घेतले व आज वस्तीवरील एक छोट्याशा समारंभात कार्डचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी आमदार सुहास आण्णा कांदे यांचे प्रतिनिधी आदिवासी समाज संघटक भाऊराव बागुल, सरपंच नागापूर शिवसेना नेते सुधाकर पवार,गोविंद सोमासे,भीमराव पवार,नितीन सोनवणे, लक्ष्मण खुरसने,पिंटू व्हडगर,रामदास सोनवणे, रोहित कूवर, लहू गायकवाड, नागू मोरे, बंसी सोनवणे, धनाजी तांबे, प्रकाश पवार, हिराबाई गोधडे, दत्तू पवार,अनिल खुरसने,अनिल सोनवणे पाचीपुल वस्ती एकलव्य नगर नागापूर येथील नागरिक उपस्थित होते.

Previous articleकाय ती येडया बाभळीची झाडी,काय ती दोध्याड नदीथडी;काय ती दाभाडी..सारेच ओक्के! सट्टा माफीया पुढे नेमके कोण झुके?
Next articleसहकार विद्या मंदिर वरवट बकाल येथे पोळा सण उत्साहात साजरा!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here