Home पुणे पिंपरी-चिंचवड शहर परिसरात पोलीस ठाण्यांचे कामकाज पिंपरी न्यायालयात येण्यासाठी पाठपुरावा करण्याबाबत पोलीस...

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात पोलीस ठाण्यांचे कामकाज पिंपरी न्यायालयात येण्यासाठी पाठपुरावा करण्याबाबत पोलीस आयुक्तांकडे अॅडव्होकेटस् बार असोसिएशनची मागणी

82
0

आशाताई बच्छाव

IMG-20230622-WA0037.jpg

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात पोलीस ठाण्यांचे कामकाज पिंपरी न्यायालयात येण्यासाठी पाठपुरावा करण्याबाबत पोलीस आयुक्तांकडे अॅडव्होकेटस् बार असोसिएशनची मागणी
पुणे : ब्युरो चिफ. उमेश पाटील
पिंपरी-चिंचवड शहर परिसरात पोलीस ठाण्यांचे कामकाज पिंपरी न्यायालयात येण्यासाठी पाठपुरावा करण्याबाबत पोलीस आयुक्तांकडे मागणी पिंपरी चिंचवड अॅडव्होकेटस् बार असोसिएशनने केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांची भेट घेण्यात आली.सदर भेटीत सध्याचे हिंजवडी, दिघी, रावेत, भोसरी स्टेशन अंतर्गत दापोडी पोलीस चौकी, दिघी पोलीस स्टेशन, वाकड पोलीस स्टेशन तसेच देहूरोड पोलीस स्टेशन नेहरूनगर येथील दिवाणी फौजदारी न्यायालयाच्या अखत्यारीत घ्यावे त्या बाबत निवेदन देण्यात आले.
यावर पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त यांनी लवकरच कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन दिले.
त्यावेळी पिंपरी चिंचवड अॅडव्होकेटस् बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड.जयश्री कुटे, सचिव ॲड.गणेश शिंदे, महिला सचिव ॲड.प्रमिला गाडे, माजी सचिव ॲड.गोरख कुंभार, माजी उपाध्यक्ष ॲड.प्रतीक जगताप तसेच सहाय्यक सरकारी अभियोक्ता साधना बोरकर उपस्थितीत होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here