Home पुणे पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालय दूध प्रश्नावर आपल्या राज्याचे दुग्धविकास मंत्री माननीय नामदार...

पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालय दूध प्रश्नावर आपल्या राज्याचे दुग्धविकास मंत्री माननीय नामदार विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न

123
0

आशाताई बच्छाव

IMG-20230622-WA0058.jpg

पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालय दूध प्रश्नावर आपल्या राज्याचे दुग्धविकास मंत्री माननीय नामदार विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न

पुणे,(युवा मराठा न्युज नेटवर्क)

रयत क्रांती संघटना व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले, त्या आंदोलनाची दखल घेऊन आज मीटिंग आयोजित केली. या मीटिंगमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांची मागणी गाईच्या दुधाला चाळीस रुपये प्रति लिटर व म्हशीच्या दुधाला 70 रुपये प्रति लिटर दर मिळाला पाहिजे. एक एप्रिल पासून राज्य सरकारने लंम्पीच्या आजाराची लस बंद केली आहे. ती त्वरित चालू करावी. ज्या पद्धतीने राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पिक विमा एक रुपया असा केला. त्याच धर्तीवर शेतकऱ्यांच्या दुधाळ जनावरांचा इन्शुरन्स एक रुपयात करावा. खाजगी व सहकारी दुधाचे ऑडिट करून दूध भेसळ वर प्रतिबंध घालण्यात यावा. अशा मागण्यासाठी आज मीटिंग झाली. या मीटिंगसाठी राज्याचे दुग्ध विकास मंत्री विखे पाटील साहेब, शेतकऱ्यांचे नेते आदरणीय माजी मंत्री सदाभाऊ खोत साहेब, भाजपचे आमदार राहुल कुल, आमदार सुरेश धस,आमदार संग्राम थोपटे, खाजगी व सहकारी दूध संघाचे सर्व अध्यक्ष व सचिव, रयत क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी दूध उत्पादक शेतकरी या मीटिंगसाठी उपस्थित होते. रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले, रयत क्रांती पक्षाचे राज्य अध्यक्ष भानूदास शिंदे,राज्य प्रवक्ते तथा सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा सुहास पाटील,प.महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलावडे, सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष बळीराम गायकवाड, पुणे जिल्ह्याचे नेते गजानन दांडेकर, सातारा जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव, सांगली जिल्हा जिल्हाध्यक्ष जाधव, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष नीताताई खोत, राज्य प्रवत्त्या अनिता ताई ताकवणे, पुणे जिल्हाध्यक्ष निलेश देवकर, आदीजन पदाधिकारी ऊपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here