Home जालना महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या वतीने योग दिवस साजरा

महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या वतीने योग दिवस साजरा

42
0

आशाताई बच्छाव

IMG-20230622-WA0055.jpg

महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या वतीने योग दिवस साजरा
जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशात 21 जून हा योगा दिन म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने महाराष्ट्र योग शिक्षक संघ जालनाच्या वतीने सकाळी 6 ते 7  वाजता शहरातील सुभद्रानगर येथील गणपती मंदिरामध्ये जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी महर्षी पतंजली ऋषींच्या फोटोचे पूजन करून महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या कार्याची माहिती अध्यक्ष सौ. शिल्पा शेलगांवकर यांनी दिली. 12 सुत्री मागणी पत्राचे सौ. भाग्यश्री पाटील यांनी वाचन केले. तसेच योग संबंधी अनंत वाघमारे यांनी माहिती दिली आणि योगाचे धडे घेण्यात आले. योगा संबंधी प्रात्यक्षिक आसन पद्मा वल्लकट्टी, संतोषी देशमुख, प्राणायाम स्वप्नाजा तुपकर, सुरेखा पवार, गिता शंकरपेल्ली यांनी घेतले. कु. नंदिनी कमळे पाटील यांनी मनस्वास्थ्यासाठी योग कसा महत्त्वपूर्ण आहे याबद्दल माहिती दिली. सदर कार्यक्रमाचे आयोजन बालकुमार चाटला यांनी केले होते. योग गुरु मनोज लोणकर यांनी विशेष मार्गदर्शन केले. या प्रसंगी महाराष्ट्र योग शिक्षक संघ जालनाचे सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here