Home गडचिरोली भारतीय जनता पार्टी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राअंतर्गत.. गडचिरोली या ठिकाणी स्टेडियम ग्राऊंडवर...

भारतीय जनता पार्टी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राअंतर्गत.. गडचिरोली या ठिकाणी स्टेडियम ग्राऊंडवर खासदार अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात २१ जून आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा

211

आशाताई बच्छाव

IMG-20230621-WA0013.jpg

भारतीय जनता पार्टी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राअंतर्गत..

गडचिरोली या ठिकाणी स्टेडियम ग्राऊंडवर खासदार अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात २१ जून आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा

गडचिरोली,(सुरज गुंडमवार,ब्युरो चीफ):-योग आहे आरोग्यासाठी क्रांती,नियमित योगामुळे जीवनात येथे सुख-शांती..आरोग्यम् धनसंपदा
करो योग,रहो निरोग संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. त्याअनुषंगाने, संपूर्ण देशात एकाच वेळी आतंरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येतो.व्यक्तीच्या शारीरिक आणि आध्यात्मिक विकासासाठी योग विद्या सहाय्यभूत आहे.आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून आज ,गडचिरोली स्टेडियम ग्राउंडवर खासदार श्री.अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात योग दिन साजरा करण्यात आले.

यावेळी प्रामुख्याने शिबिराला जिल्हा महामंत्री प्रशांतजी वाघरे,जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा,योग शिक्षक अनिल निकोडे,योग शिक्षक खुशाल म्हस्के,जिल्हा उपाध्यक्ष भारत खटि,जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर,शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, प्रशांत भुगुवार,अनिल कुनघाडकर, सचिनभाऊ तंंगडपल्लीवार,केशव निंबोड, राकेश शेरकी,राकेश राचमलवार, हर्षल गेडाम, तसेच कार्यकर्ते व मोठ्या संख्येने युवक वर्ग या योग शिबिराला उपस्थित होते.

या शिबिराच्या निमित्याने या शिबिराला अतिशय चांगला योग शिकवणारे योग शिक्षक अनिल निकोडे,खुशाल मस्के यांचे शाल श्रीफळ देऊन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय योग दिन शिबिर यशस्वीपणे संपन्न झाला
#yogaday2023 #WorldYogaDay #gadchiroli #ashoknetemp

Previous articleबाईक रॅली भा. ज.पा. युवा मोर्चा जिल्हा महामंत्री श्री मधुकर केशव भांडेकर यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक
Next articleमहाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या वतीने योग दिवस साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.