Home पुणे पिंपरी विधानसभेत भाजपच एक क्रमांकाचा पक्ष असेल; भाजपाच्या चिंतन बैठकीत कार्यकर्त्यांचा निर्धार

पिंपरी विधानसभेत भाजपच एक क्रमांकाचा पक्ष असेल; भाजपाच्या चिंतन बैठकीत कार्यकर्त्यांचा निर्धार

116

आशाताई बच्छाव

IMG-20230708-WA0051.jpg

पिंपरी विधानसभेत भाजपच एक क्रमांकाचा पक्ष असेल; भाजपाच्या चिंतन बैठकीत कार्यकर्त्यांचा निर्धार
पुणे: ब्युरो चिफ उमेश पाटील
पिंपरी विधानसभेत भाजपच एक क्रमांकाचा पक्ष असेल; भाजपाच्या चिंतन बैठकीत कार्यकर्त्यांचा निर्धार
राज्यात २ जुलै रोजी झालेल्या राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष पिंपरी विधानसभा सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मंथन बैठक भाजपा शहर कार्यालय मोरवाडी येथे आयोजित करण्यात आली होती. या वेळी बदलल्या राजकीय समीकरणाचा भाजपा संघटनावर काय परिणाम होत आहे, कार्यकर्त्यांचा काय समस्या आहेत हे जाणून घेण्यासाठी शहर अध्यक्ष आमदार महेश लांडगे, निवडणूक प्रमुख अमित गोरखे व विधानसभा प्रमुख कार्यकर्त यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली.
बदललेल्या राजकीय समीकरणानंतर कार्यकर्ते यांच्या भावना समजून घेण्यासाठी मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरीत भाजपा कार्यकर्ता संघटन अधिक मजबूत करण्यासाठी व पुन्हा नरेंद्र मोदी यांना देशाचे पंतप्रधान करण्यासाठी आम्ही सर्व एकत्रित येऊन काम करणार आहोत. भाजपा कार्यकर्ते यांच्या भावनांची नोंद घेऊन आपल्या समस्या वरिष्ठ नेते यांच्यापर्यंत पोहचवल्या जाईल अशी माहिती पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी सांगितले.
राजकीय समीकरण जरी बदलले असले तरी भाजपा पक्ष हा अधिक सक्षमपणे पुढील वाटचाल करेल. सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी झालेला बदल स्विकारून आपल्या पक्ष संघटनेस अधिक मजबूत केले पाहिजे. येणाऱ्या सर्व निवडणुकीत भाजपा हाच एक क्रमांकचा पक्ष असेल हा निर्धार करून आपण सर्वांनी अधिक जोमाने कामाला लागले पाहिजे. भोसरी विधानसभा अथवा शिरूर लोकसभेची जरी जबाबदारी माझ्यावर असली तरी पिंपरी विधानसभेतील सर्व कार्यकर्ते यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही आहोत अशी ग्वाही शहर अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी दिली.
काही निर्णय व त्याचे परिणाम समजून येण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे आपण सर्वांनी सकारात्मक भूमिका घेऊन पुढील काळात वाटचाल केली पाहिजे, असा सल्ला प्रदेश सदस्य सदाशिव खाडे यांनी दिला.
यावेळी युवा मोर्चा उपाध्यक्ष अनुप मोरे, सरचिटणीस राजू दुर्गे, नगरसेवक शीतल शिंदे, माउली थोरात, केशव घोळवे, अनुराधा गोरखे, सुजाता पालंडे, शैलेश मोरे, आर एस कुमार, प्रकाश जवळकर, विशाल वाळूंजकर इतरांनी आपली मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी मंडल अध्यक्ष विजय शिनकर, महेंद्र बाविस्कर, शर्मिला बाबर, कोमल शिंदे, कमलेश भारवाल, रेखा कडाली, संजय मोगाडेकर, कैलास कुटे, गणेश लंगोटे व मोठ्या संखेने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थितीत होते.

Previous articleभारत राष्ट्र समितीच्या मुखेड विधानसभा संपर्क अभियानाला जोरदार प्रतिसाद.
Next articleशिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज.९ व उद्या १० जुलै रोजीअमरावती शहरात; कार्यकर्त्यांशी संवाद..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.