Home Breaking News 🛑 बँकेत कमीत कमी बचत दारांनी…..! २००० रक्कम जमा ठेवावी…..! बँकेने बदलले...

🛑 बँकेत कमीत कमी बचत दारांनी…..! २००० रक्कम जमा ठेवावी…..! बँकेने बदलले नियम 🛑 ✍️नवी दिल्ली :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

98
0

🛑 बँकेत कमीत कमी बचत दारांनी…..! २००० रक्कम जमा ठेवावी…..! बँकेने बदलले नियम 🛑
✍️नवी दिल्ली 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नवी दिल्ली :⭕काही बँकांनी १ ऑगस्टपासून मिनिमम बॅलन्स अन् व्यवहाराचे नियम बदलले आहेत. बँकांनी १ ऑगस्टपासून किमान शिल्लक शुल्क रक्कम न ठेवल्यास त्यावर शुल्क आकारण्याची घोषणा केली. यासोबतच या बँकांमध्ये तीन विनामूल्य व्यवहारानंतर शुल्कदेखील वसूल केले जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला चाप बसण्यची शक्यता आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra), ॲक्सिस बँक(Axis Bank), कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) आणि आरबीएल बँक या बँकांमध्ये हे नवे नियम १ ऑगस्टपासून लागू करण्यात येणार आहे.

नव्या नियमानुसार, बँक ऑफ महाराष्ट्रच्या बचत खातेदारकांना मेट्रो आणि शहरी भागात आपल्या खात्यात किमान २ हजार रूपये ठेवणे बंधनकारक आहे.

यापूर्वी १ हजार ५०० रूपये ठेवणे बंधनकार होते. उर्वरित रक्कम २०० रुपयांपेक्षा कमी असल्यास बँक मेट्रो आणि शहरी भागात ७५ रुपये, निम-शहरी भागात ५० रुपये आणि ग्रामीण भागात दरमहा २० रुपये असे शुल्क आकारणार आहे.

⭕बँक ऑफ महाराष्ट्र⭕

बँक ऑफ महाराष्ट्राच्या सर्व शाखांमध्ये तीन विनामूल्य व्यवहारानंतर ठेव आणि पैसे काढण्यासाठी १०० रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे. यासोबतच लॉकरसाठी ठेवीची रक्कम कमी करण्यात आली आहे. मात्र, त्यावरील दंड वाढवण्यात आला आहे.

बँक ऑफ महाराष्ट्राचे एमडी आणि सीईओ ए एस राजीव म्हणाले, कोरोना संक्रमणामुळे डिजिटल बँकिंगला चालना देण्यासाठी आणि बँकेत कमी लोक यावेत, यासाठी बँक सध्या हे सर्व करीत आहे. बँक सेवा शुल्कातही काही बदल करण्यात आले आहेत.

⭕ॲक्सिस बँक⭕

ॲक्सिस बँकेच्या खातेधारकांना ECS व्यवहारावरील प्रत्येक व्यवहारावर २५ शुल्क बसणार आहे. यापूर्वी ECS व्यवहारावर कोणत्याच प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नव्हते. खासगी बँकेने १०/२० रुपये आणि ५० रुपये बंडलप्रमाणे १०० रुपये प्रति बंडलसाठी हँडलिंग फी आकारणार आहे.

⭕कोटक महिंद्रा बँक⭕

कोटक महिंद्रा बँकेच्या डेबिट कार्ड-एटीएममधून महिन्याला पाच वेळा पैसे काढल्यानंतर पुढच्या व्यवहारात रोख रक्कम काढण्यावर २० रुपये शुल्क आकारलं जाणार आहे. तसेच गैर-आर्थिक व्यवहारावर ८.५ रुपये शुल्क असेल. खात्यात शिल्लक रक्कम कमी असल्यानं व्यवहार अयशस्वी झाल्यास २५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. यासोबतच प्रत्येक चौथ्या व्यवहारासाठी प्रतिव्यवहार १०० रुपये रोख फी आकारण्यास सुरू केली गेली आहे….⭕

Previous article🛑 **कोरोना रुग्णांवर खासगी रुग्णालयात मोफत उपचार,….! फक्त महाराष्ट्राचा नागरिक हवा**🛑 ✍️उल्हासनगर :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
Next articleजप्त वाहनांचा लिलाव* *राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर* *कोल्हापूर (ब्युरो चिफ युवा मराठा न्युज )*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here