• Home
  • जप्त वाहनांचा लिलाव* *राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर* *कोल्हापूर (ब्युरो चिफ युवा मराठा न्युज )*

जप्त वाहनांचा लिलाव* *राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर* *कोल्हापूर (ब्युरो चिफ युवा मराठा न्युज )*

*जप्त वाहनांचा लिलाव*
*राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर*

*कोल्हापूर (ब्युरो चिफ युवा मराठा न्युज )*

*कोल्हापूर* – राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक कार्यालयातील जप्त केलेल्या वाहनांचा व इतर जप्त मुद्देमालाचा (बॅरेल, बाटल्या इ.साहीत्याचा ) लिलाव दि. 28 जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एस.एस. बरगे
यांनी दिली.

अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रंकाळा टॉवर या कार्यालयाच्या आवारात दि. 26 मार्च रोजी
होणारा लिलाव कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात
आला होता.
कोव्हिड-19 विषाणूच्या सर्व नियम, अटी व सूचनांचे पालन करून कार्यालयाच्या आवारात हा लिलाव होणार आहे.

anews Banner

Leave A Comment