Home Breaking News *गडचिंचले हत्याप्रकरणी आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल* (वैभव पाटील प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

*गडचिंचले हत्याप्रकरणी आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल* (वैभव पाटील प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

163
0

*गडचिंचले हत्याप्रकरणी आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल*

(वैभव पाटील प्रतिनिधी युवा मराठा न्युज)
पालघर दि १७ : डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे जमावाने दोन साधू व त्यांच्या चालकांची दगडाने ठेचुन हत्या केल्या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने तपास पूर्ण केला असून डहाणू न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.
कासा पोलीस ठाणे , जि . पालघर येथे गुन्हा रजिस्टर नंबर ७६ , ७७ , व ७८ २०२० असे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.नमुद तीनही गुन्हयाचा तपास राज्य शासनाकडुन राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग होणेपुर्वी पालघर पोलीसांकडून करण्यात आला आहे . दि . २१/०४/२०२० रोजी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने तीनही गुन्हयाचा तपास आपल्याकडे घेऊन , गुन्हयांचा तपास विभागाचे कोकण भवन पथकाकडे सोपवण्यात आला होता.

अतुलचंद्र कुलकर्णी , अपर पोलीस महासंचालक , राज्य गुन्हे अन्वेषण विभाग , महाराष्ट्र राज्य यांनी गुन्हयाचे तपासाकरीता अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन देऊन विविध तपास पथकांची नियुक्ती केली . ज्यामध्ये पोलीस अधीक्षक , अजय देवरे , राज्य गुन्हे अन्वेषण विभाग , नाशिक पथक व इतर अधिकारी यांचा समोवश होता . प्रविण साळुके विशेष पोलीस महानिरीक्षक ( गुन्हे – पश्चिम ) , राज्य गुन्हे अन्वेषण विभाग , महाराष्ट्र राज्य , पुणे यांना तपास पथकाचे प्रमुख म्हणून नेमण्यात आले होते .
तपास पथक प्रमुख व तपास पथक हे संपुर्ण तपास कालावधी मध्ये कासा येथे कोव्हीड -१ ९ या आव्हानात्मक परिस्थिती मध्ये मुक्कामी थांबुन गुन्हयातील आरोपींना शोधुन त्यांना अटक करणे , आरोपींच्या वास्तव्याबाबतची गोपनीय माहिती प्राप्त करणे , तसेच घरझडती व गुन्हयात वापरण्यात आलेले हत्यार जप्ती इ . महत्वाचे कामगिरी गुन्हयात ९ ० दिवसाचे कायदेशीर तरतुदीनुसार अटक आरोपींविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याचे निश्चित करुन त्या अनुषंगाने कामगिरी पुर्ण केली आहे .

नमुद गुन्हे तपासामध्ये राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने एकुण ८०८ संशयित व १०८ साक्षीदार इसमांकडे तपास करुन भक्कम असा पुरावा आरोपीविरुध्द गोळा करण्यात आला आहे . त्यानुसार अटक १५४ आरोपी व ११ विधीसंघर्ष ग्रस्त बालक यांना ताब्यात घेण्यात आले असुन , त्यापैकी कोणालाही आजपर्यंत जामिन मंजुर झालेला नाही .

कासा पोलीस ठाणे , जि . पालघर गुन्हा रजि . नं . ७६/२०२० या गुन्हयामध्ये १२६ आरोपीविरुध्द भादंवि क . ३०२ , ३०७ , १२० ( ब ) , १० ९ , ११७ , १४३ , १४४ , १४५ , १४७ , १४८ , १४ ९ , १५२ , १५३ , १८८ , २०१ , २६ ९ , २७० , २ ९ ० , ३३२ , ३४१ , ३४२ , ३५३ , ४२७ , ५०५ ( २ ) , ३४ सह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे क , ५१ ( ब ) , ५२ , ५४ सह साथीचे रोग अधिनियम १८ ९ ७ चे क . २ , ३ , ४ , ५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम क . १३५ सह ३७११ ) ( ३ )

सह सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम १ ९ ८४ चे क , ३.५ अन्वये ४ ९९ ५ पृष्ठांचे दोषारोपपत्र मा . प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी , डहाणू यांचे न्यायालयात पोलीस उप अधीक्षक व तपास अधिकारी विजय पवार यांनी दाखल केले आहे .

तसेच कासा पोलीस ठाणे , जि . पालघर गुन्हा रजि . नं . ७७/२०२० या गुन्हयामध्ये १२६ आरोपीविरुध्द भादंवि क , ३०२ , ३०७ , १२० ( ब ) , १० ९ , ११७ , १४३ , १४४ , १४५ , १४७ , १४८ , १४ ९ . १५२ , १५३ , १८८ , २०१ , २६ ९ , २७० , २ ९ ० , ३३२ , ३४१ , ३४२ , ३५३ , ४२७ , ५०५ ( २ ) , ३४ सह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे क . ५१ ( ब ) , ५२ , ५४ सह साथीचे रोग अधिनियम १८ ९ ७ चे क . २ , ३ , ४ , ५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम क . १३५ सह ३७ ( १ ) ( ३ ) सह सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम १ ९ ८४ चे क . ३ , ५ अन्वये ५ ९ २१ पृष्ठांचे दोषारोपपत्र मा , प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी , डहाणू यांचे न्यायालयात पोलीस उप अधीक्षक व तपास अधिकारी इरफान शेख यांनी दाखल केले आहे .

तसेच गुन्हयातील विधीसंघर्ष ग्रस्त बालकांविरुध्द देखील भक्कम पुरावे प्राप्त करण्यात आले असुन त्यांचेबाबत स्वतंत्र कारवाई होणेचे अनुषंगाने बाल न्याय मंडळ यांना अहवाल सादर करण्यात येणार असुन , गुन्हयांचा तपास प्रगती पथावर आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here