Home पालघर पालघर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

पालघर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

141
0

आशाताई बच्छाव

IMG-20230621-WA0024.jpg

पालघर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

पालघर ,युवा मराठा न्युज नेटवर्क
आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी योगशिक्षकांसह 3 हजार 376 शालेय विद्यार्थ्यांच्या बरोबरीने पालघर येथील आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या मैदानावर योगासने करून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला सकाळपासूनच मैदान योगमय झाले होते.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पालघरच्या वतीने योग दिनाच्या निमित्ताने शासकीय कार्यक्रमाचे आयोजन पालघर येथील आर्यन हायस्कूलच्या मैदानावर करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर पालघरचे तहसीलदार शेंडगे शिक्षणाधिकारी संगीता भागवत तालुका शिक्षणाधिकारी निमिष मोहिते जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास वनमाने, प्रकाश वाघ आणि पतंजली परिवार पालघरच्या वतीने अखंडिता बाजपेयी, गजानन किणी, काळुराम चौधरी व त्यांचे सहकारी त्याचप्रमाणे विविध शाळेतील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सफाळे येथील विदीश राऊत यांने रीदमिक योगासनाची प्रात्यक्षिके दाखवली विदिश राऊत हा योगामध्ये राष्ट्रीय स्तरावर आपल्या जिल्ह्याचे नाव लौकिक वाढवत आहे. 2020 साली योगा फेडरेशनने आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत त्यांने सुवर्णपदक पटकावले होते. विदिश हा राज्य व राष्ट्रीय स्तरावर पारितोषिके पटकावत आहे. त्याच्या या कामगिरीची दखल घेत जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते विदीश राऊत यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

नियमित योगासने करणे गरजेचे हन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी उपस्थित विद्यार्थी
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने संपूर्ण पालघर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालये कनिष्ठ महाविद्यालय कंपन्याच्या कार्यालयांमध्ये तसेच शासकीय कार्यालयांमध्ये योग दिन योगमय वातावरणात साजरा करण्यात आला.

Previous articleटेनिस क्रिकेट असोसिएशनच्या तालुकास्तरावर तालुका प्रमुखाची होणार निवड
Next articleजळगाव जि.प. समोर आत्मदहनाचा प्रयत्न, अतिक्रमणाचा हटविण्याची मागणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here