Home जळगाव जळगाव जि.प. समोर आत्मदहनाचा प्रयत्न, अतिक्रमणाचा हटविण्याची मागणी

जळगाव जि.प. समोर आत्मदहनाचा प्रयत्न, अतिक्रमणाचा हटविण्याची मागणी

169
0

आशाताई बच्छाव

IMG-20230621-WA0069.jpg

जळगाव जि.प. समोर आत्मदहनाचा प्रयत्न, अतिक्रमणाचा हटविण्याची मागणी
जळगाव जिल्हा ब्यूरो चिफ, योगेश पाटील.

जळगाव जि.प. समोर आत्मदहनाचा प्रयत्न, अतिक्रमण हटविण्याची मागणी
जळगाव- भडगाव तालुक्यातील कजगाव येथील बसस्थानक परिसरात अतिक्रमण झाले आहे. यावर कारवाईसाठी वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्याने तक्रारदार भूषण पाटील या तरूणाने आज(२० जून) दुपारी जिल्हा परिषद समोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र घटनास्थळी पोलीस हजर असल्याने पुढील अनर्थ टळला आहे.
भडगाव तालुक्यातील कजगाव बसस्थानक परिसरात अतिक्रमण करण्यात आलेले आहे. हे अतिक्रमण काढण्या बाबत तक्रारदार भूषण नामदेव पाटील, स्वप्निल प्रल्हाद पाटील, चेतन रवींद्र पाटील आणि जीवन प्रभाकर चव्हाण सर्व रा. कजगाव ता. भडगाव यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, भडगाव तहसील कार्यालय, पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्याकडे वारंवार निवेदन तक्रारी व अर्ज केलेले आहे. अतिक्रमण काढण्याबाबत प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही, यासंदर्भात यापूर्वी या तरुणांनी
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता, परंतु त्यावेळी देखील खोटे आश्वासने देऊन जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणात अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्याने तक्रारदार भूषण नामदेव पाटील याने आज अंगावर पेट्रोल टाकू आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी या तरुणास ताब्यात घेतले त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

Previous articleपालघर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
Next articleभारतीय स्टेट बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पार्डी ग्रामपंचायत कार्यालयास भेट.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here