*पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाच्या नैराश्यातून फेसबुकवर पोस्ट टाकत तरुणाची आत्महत्या*उमराणे,दि.१६ (राहूल मोरे युवा मराठा न्युज ) –
उमराणे ता.देवळा येथील तरुणाने आपल्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाच्या नैराश्यातून आज मंगळवार (ता.१६) रोजी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्याने लिहिलेली चिट्ठी फेसबुकवर पोस्ट टाकत आत्महत्येचे कारण विशद केले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, उमराणे ता.देवळा येथील राहुल शरद चव्हाण (वय २७) याने आज सकाळी ११ वाजता आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत त्याने यामागचे कारण दिले असून त्यात लिहिले आहे की, पत्नी ही विवाहबाह्य संबंध ठेवत असल्याने व त्यातून ती एका इसमासोबत शनिवार ता.१३ जून पासून पळून गेल्याने गावात इज्जत गेली. गावात व समाजात बदनामीच्या विचारामुळे नैराश्यभावनेतून आत्महत्या करत असल्याचे चिट्ठीत लिहिले आहे. माझ्या मृत्यूस पत्नी आणि तो इसम हेच कारणीभूत आहेत असा उल्लेख या चिट्ठीत शेवटी केला आहे. या घटनेमुळे उमराने गावात व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. देवळा पोलिसांत याबाबतच्या गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत चालू होती. पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर पुढील तपास करत आहे.
Home Breaking News *पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाच्या नैराश्यातून फेसबुकवर पोस्ट टाकत तरुणाची आत्महत्या*