• Home
  • शिवजन्मोत्सव तिथीनुसार शिवसेना शहर शाखेतर्फे आयोजन

शिवजन्मोत्सव तिथीनुसार शिवसेना शहर शाखेतर्फे आयोजन

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220321-WA0003.jpg

शिवजन्मोत्सव तिथीनुसार शिवसेना शहर शाखेतर्फे आयोजन
गडचिरोली:(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-आज दिनांक 21 मार्च 2022 रोजी गडचिरोली शहर शिवसेना जिल्हा कार्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक क्षत्रिय कुलावंत राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार शिवजयंतीचे औचित्य साधून शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने शिव जन्मोत्सव शहरातील शिवसेना जिल्हा कार्यालय सकाळी 11 वाजता शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात येईल व झेंडा वंदन होणार सायंकाळी मिरवणूक काढण्यात येईल शिवसेना जिल्हा कार्यालयातून ते इंदिरा गांधी चौक, त्रिमूर्ती चौक, गांधी चौक, बेसिक शाळा, वंजारी मोहल्ला, विठ्ठल मंदिर, श्रीराम मंदिर, आरमोरी रोड, परत इंदिरा गांधी चौकातून शिवसेना कार्यालयात पोहोचणार.
तरी होणाऱ्या शिव जन्मोत्सव च्या सोहळ्यात सर्व शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांना तसेच शिवभक्त जास्तीत जास्त संख्येने शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीचा आनंद घ्यावा. असे आवाहन शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

anews Banner

Leave A Comment