*खा.उदयनराजे भोसलेनीं राज्य सभेत केली घोषणा जय भवानी जय शिवाजी .*
*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्यूज)*
राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी राज्यसभा सदनात आज (22 जुलै) खासदारकीची शपथ घेतली. भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदाच खासदारकीची शपथ घेतली. इंग्रजीतून घेतलेल्या शपथेनंतर घोषणा दिल्याने उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांना उदयनराजे यांना समज द्यावी लागली (Rajyasabha MP Udayanraje Bhosale took Oath in English)
‘I Udayanraje Pratapsinhraje Bhosale…’ अशी इंग्रजी भाषेत दमदार आवाजात शपथ घेण्यास उदयनराजेंनी सुरुवात केली. शपथ घेऊन झाल्यावर त्यांनी ‘जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी’ अशी घोषणा दिली.
‘तुम्ही सदनात नवीन आहात, त्यामुळे सांगतो की हे रेकॉर्डवर जाणार नाही, फक्त तुमची शपथ नोंदवली जाईल. सदनात कोणतीही घोषणा देण्याची मुभा नाही, हे भविष्यात लक्षात असू द्या’ अशा शब्दात व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजे यांना समज दिली.
भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, काँग्रेस नेते राजीव सातव, शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी आणि भाजपच्या भागवत कराड या महाराष्ट्रातील सहा खासदारांनी शपथ घेतली. आठवले आणि उदयनराजेंनी इंग्रजी, शरद पवारांनी हिंदी, तर कराड, सातव, चतुर्वेदी यांनी मराठीतून शपथ घेतली.
