Home Breaking News वर्षा उसगावकर यांचे वडील अच्युत उसगावकर यांचे निधन

वर्षा उसगावकर यांचे वडील अच्युत उसगावकर यांचे निधन

94
0

🛑 वर्षा उसगावकर यांचे वडील अच्युत उसगावकर यांचे निधन 🛑
✍️गोवा ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

पणजी :⭕ मराठी सिने सृष्टीतील अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचे वडिल अच्युत उसगावकर यांचे मंगळवारी गोव्यात निधन झाले. गोव्यात मुक्तीनंतर अधिकारावर आलेल्या स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांच्या मंत्रिमंडळात उसगावकर हे मंत्री होते.

उसगावकर हे मिरामार येथे राहत होते. वृद्धापकाळाने अलिकडे ते आजारी होते. त्यांची प्राणज्योत मालवल्याचे कळताच गोव्यातील विविध समाज घटकांत दु:ख व्यक्त झाले. गोव्याची पोर्तुगीज राजवटीतून 1961 साली मुक्तता झाली व मग महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या सत्तेचा काळ सुरू झाला. हा पक्ष 17 वर्षे सत्तेत होता.

उसगावकर हे मगो पक्षाचे नेते होते. आमदार व मंत्री म्हणून 70 च्या दशकात उसगावकर यांनी नाव कमावले.
प्रथम भाऊसाहेब बांदोडकर व मग भाऊंची कन्या स्वर्गीय शशिकला काकोडकर यांच्या मंत्रिमंडळात उसगावकर मंत्री होते. प्रतापसिंग राणे, गोपाळराव मयेकर, रमाकांत खलप, स्व जयसिंगराव राणे आदींचे राजकारणातील सहकारी म्हणून उसगावकर यांनी काम केले.

बांबोळीच्या गोमेकाॅ इस्पितळात सकाळी साडे सात वाजता त्यांचे निधन झाले. आज सायंकाळी चार वाजता अंत्यसंस्कार होतील.⭕

Previous articleहातकणंगले तालुक्यातील चंदुर येथील एका कॉलेज युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या
Next article*पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाच्या नैराश्यातून फेसबुकवर पोस्ट टाकत तरुणाची आत्महत्या*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here