Home Breaking News सुशिलताई जाधव विद्यानिकेतन मध्ये उन्हाळी शिबिराचे आयोजन

सुशिलताई जाधव विद्यानिकेतन मध्ये उन्हाळी शिबिराचे आयोजन

52
0

Anshuraj Patil

सुशिलताई जाधव विद्यानिकेतन मध्ये उन्हाळी शिबिराचे आयोजन
वाशिम:दि 28 एप्रिल
श्री व्यंकटेश सेवा समिती द्वारा संचालित सौ.सुशीलाताई जाधव विद्यानिकेतन लाखाळा, वाशिम या ठिकाणी (summer Camp) उन्हाळी शिबिराचे आयोजन 25 एप्रिल ते 5 मे पर्यंत करण्यात आले.त्यानिमित्ताने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका कु. ज्योती भाकरे तसेच प्रमुख पाहुणे श्रीकांत जोशी,गणेश भरडे व उद्घाटक म्हणून गणेश गोरे हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उन्हाळी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर कु. दुर्गा कढणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविका मधून शिबीराचे महत्त्व सांगितले. आणि मुलांना साहित्य वाटप करण्यात आले. योगशिक्षक आशिष यांनी योगासने आणि प्राणायाम प्रात्यक्षिशिकाने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर समर कॅम्प मधील काही सामूहिक गीते घेण्यात आली.सकाळी योगा व प्राणायाम त्यानंतर चेंडू चे वेगवेगळे खेळ घेण्यात आले. त्यानंतर चित्रकला शिक्षक कु.पूजा पौळकर हिने चित्रकलेचे महत्व तसेच प्रात्यक्षिक मुलांकडून करून घेतले. स्वरकुंज महाविद्यालयाचे शिक्षक सुमित खासभागे आणि मोहिनी खासबागे मनोरंजनात्मक वातावरणातून पार पडले कार्यक्रमाला सर्वच शिक्षक कू.ज्योती भाकरे, दुर्गा कढणे, राधा साबळे, जया आरु, गायत्री देशमुख, अशोक ढोके, हिप्पी भीसडे, अनिल गोरे,राधेश्याम गवळी रघुनाथ करवते शिक्षकेतर कर्मचारी गजानन कव्हर आदी सर्व उपस्थित होते.

Previous articleउमेदवारांनो इकडे लक्ष द्या!! महापालिका निवडणुकीची तारीख जाहीर ! लवकरच गुलाल उडणार
Next articleसामाजिक कार्यकर्ते गजानन पवार पाटील यांच्या प्रयत्नाला यश
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here