• Home
  • सामाजिक कार्यकर्ते गजानन पवार पाटील यांच्या प्रयत्नाला यश

सामाजिक कार्यकर्ते गजानन पवार पाटील यांच्या प्रयत्नाला यश

Anshuraj Patil

IMG-20220429-WA0002.jpg

सामाजिक कार्यकर्ते गजानन पवार पाटील यांच्या प्रयत्नाला यश
सापळी गावामध्ये सामान्य जनतेला पिण्याचे पाणी दोन किलोमीटर अंतरावरून भर उन्हाळ्यामध्ये आणावे लागत होते आणि गावांमध्ये भीषण पाण्याची टंचाई भासली होती तरी या करिता पाण्याच्या मुद्द्यासाठी गावातील स्थानिक बाबाराव कदम शंकर चव्हाण नरसिंह ढगे गजानन सरगड शिवप्रसाद ढगे किशोर ढगे भागवत रमेश ढगे प्रवेश ढगे व सामाजिक कार्यकर्ते गजानन पवार पाटील यांनी भाग घेतला म्हणून कुठेतरी ग्रामपंचायत सापळी ची झोप उडाली आणि ग्रामपंचायत सदस्य व तंटामुक्ती अध्यक्ष पिंटू ढगे यांनी अखेर हा मुद्दा मार्गी लावला व विहिरी मध्ये पाणी सोडले आणि त्यांच्यासमवेत ग्रामपंचायत सदस्य गजानन टेकाळे ग्रामपंचायत ऑपरेटर राम कव्हर पाटील व सचिन रोकडे व शामराव कोंडबा ढगे यांनी हि सहकार्य केले . त्याबद्दल मी स्वतः आणि सापळी ग्रामवासी आनंद व्यक्त करत आहे.

anews Banner

Leave A Comment