Home बुलढाणा युवा मराठा न्युजचा मोठ्ठा दणका संग्रामपूरचे  वादग्रस्त आणि मुजोर तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर...

युवा मराठा न्युजचा मोठ्ठा दणका संग्रामपूरचे  वादग्रस्त आणि मुजोर तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांची अखेर उचलबांगडी..

265
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20230613-WA0050.jpg

युवा मराठा न्युजचा मोठ्ठा दणका संग्रामपूरचे  वादग्रस्त आणि मुजोर तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांची अखेर उचलबांगडी..
ब्यूरो चीफ स्वप्निल देशमुख बुलढाणा

संग्रामपुर:- येथील वादग्रस्त आणि मुजोर तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वरणगावकर यांचा माहूर पासून वादग्रस्त प्रवास ठरलेला आहे, मनस्ताप देणाऱ्या तहसीलदाराची बदली करा नाहीतर अनुचित प्रकार घडू शकतो. असे नांदेडच्या तलाठी संघटनेने इशारा दिला होता. माहूर तहसील ला तहसीलदार म्हणून सिद्धेश्वर वरणगावकर असताना सुद्धा तेथील सामान्य नागरिकांपासून तर सर्व कर्मचारी अधिकारी हे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्या हुकूमशाहीला व मनमानीला वैतागले होते. जवळपास सहा वर्षापासून सिद्धेश्वर वरणगावकर हे माहूर तहसीलदार पदावर पदावर ठाण मांडुन बसले होते तसेच तालुक्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्या पासुन मानसिक आणि शारीरिक त्रास असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या अनेक तक्रारीनंतर तहसीलदार वरणगावकर यांची माहूर येथून संग्रामपूर येथे बदली झाली परंतु ठिकाण जरी बदलले तरी त्यांचा खुंशी स्वभाव हा सोबतच असल्याने संग्रामपूर तालुक्यामध्ये सुध्दा तलाठी व मंडळ अधिकारी यांनी भरपावसात आंदोलन केले होते
तहसीलदार तलाठ्यांना असभ्य वागणुक देत होते आठवडाभर संग्रामपुर तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकारी रजेवर गेले होते तहसीलदारवर कारवाई न इााल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा उपविभागातील तलाठी, मंडऴ अधिकारी, आपल्याकडील साहित्य डीएससी कार्यालयात जमा करतील तसेच निवडणूक व नैसर्गिक आपत्तीचे काम वगळून इतर कामांवर बहिष्कार टाकतील असा इशारा देण्यात आला होता . तहसीलदार वरणगावकर यांच्या मनमानीची बातमी प्रसिद्ध केल्यास तहसीलदार वरणगावकर हे पत्रकारांना पण खोट्या केसेस मध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असत. जवळपास फक्त रेती रेतीमाफी यांनाच त्यांचे पाठबळ मिळत होते त्यामुळे तालुकाभर अवैध रेती उत्खनन व वाहतुकीचे जाळे सर्वत्र पसरलेले आहे आता येणाऱ्या नवीन तहसीलदार श्री योगेश्वर टोपे यांना मात्र अवैद्य रेती वाहतुकीवर आळा बसवण्यासाठी फार कसरत करावी लागेल येणाऱ्या काळात नवीन तहसीलदार यांच्याकडून सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळेल व अवैद्य रेतीला आळा बसेल अशी सर्वसामान्यांमध्ये आशेचे किरण दिसून येत आहे .

Previous articleटाळ- मृदंगाच्या गजरात, निघाली नवरदेवाची वरात….!! डी.जे. बँडला टाळून उभा केला एक नवीन आदर्श
Next articleकृषी चिकित्सालयाची इमारत असून सुद्धा शेलापुर येथील मंडळ कृषी अधिकारी कार्यालय स्थलांतरित
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here