Home बुलढाणा कृषी चिकित्सालयाची इमारत असून सुद्धा शेलापुर येथील मंडळ कृषी अधिकारी कार्यालय स्थलांतरित

कृषी चिकित्सालयाची इमारत असून सुद्धा शेलापुर येथील मंडळ कृषी अधिकारी कार्यालय स्थलांतरित

57
0

आशाताई बच्छाव

IMG-20230613-WA0033.jpg

कृषी चिकित्सालयाची इमारत असून सुद्धा शेलापुर येथील मंडळ कृषी अधिकारी कार्यालय स्थलांतरित
युवा मोताळा तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर मोताळा: तालुक्यातील शेलापुर बु . येथे कृषी चिकित्सालयाची इमारत जुनी झाली आहे. या कारणामुळे येथील मंडळ कृषी अधिकारी कार्यालय “हम करे सो कायदा’ या उकतीप्रमाणे मोताळा येथे स्थलांतरित केल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गाला लहान मोठ्या कामांसाठी मोताळा येथे जावे लागत असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजी असून वास्तविक पाहता तालुक्यातील अनेक ठिकाणी असलेले मंडळ कृषी अधिकारी कृषी विभागाच्या कर्मचारी वर्गाला त्रास होऊ नये म्हणून की काय शेतकऱ्यांना त्रास व्हावा म्हणून तालुक्या ठिकाणी मोताळा एन 42 अंश सेल्सिअस तापमान मध्ये छोट्या मोठ्या कामांसाठी कृषी कार्यालयाची वारी करावी लागते हा खटाटो करण्यात आला असा गंभीर प्रश्न शेतकरी वर्गापुढे एन् खरिपाची पेरणी
जवळ असताना उभा राहिला आहे. तरी जिल्हा कृषी अधीक्षक यांनी लक्ष घालून वेगवेगळ्या ठिकाणी निर्देशित मंडळ कृषी अधिकारी कार्यालय व त्यांच्या कर्मचाऱ्याचा स्टॉप उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here