Home गडचिरोली खासदार अशोक जी नेते यांनी केलेल्या प्रयत्नांनी मेडिगट्टा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अखेर धनादेशाचे...

खासदार अशोक जी नेते यांनी केलेल्या प्रयत्नांनी मेडिगट्टा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अखेर धनादेशाचे वाटप …

75
0

आशाताई बच्छाव

IMG-20230613-WA0026.jpg

खासदार अशोक जी नेते यांनी केलेल्या प्रयत्नांनी मेडिगट्टा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अखेर धनादेशाचे वाटप …

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ):-मेडीगट्टाच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ३७ कोटींची मदत
१५ जूनला होणार धनादेशाचे वाटप
गडचिरोली- तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर बनविलेल्या मेडीगड्डा बॅरेजच्या बॅकवॅाटर आणि ओव्हरफ्लोच्या पाण्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे आणि पिकांचे नुकसान झाले त्यांना ३७ कोटी रुपयांची नुकसानभरपाई दिली जाणार आहे. येत्या १५ जून रोजी सिरोंचा येथील तहसील कार्यालयात धनादेश वाटपाचा कार्यक्रम खासदार अशोक नेते व इतर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार आहे.
या कार्यक्रमाला विधान परिषद सदस्य आ.रामदास आंबटकर, आ.धर्मरावबाबा आत्राम, माजी मंत्री शोभाताई फडणविस, माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात मेडीगड्डा बॅरेजमध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा जमा झाल्याने नदीचे तुंबलेले पाणी (बॅकवॅाटर) लगतच्या अनेक शेतांमध्ये शिरले होते. तसेच ओव्हरफ्लोचे पाणी अंकिसा आणि परिसरातील गावे आणि शेतांमध्ये शिरून पिकांसह अनेक शेतकऱ्यांची शेतजमिनही खरडून गेली. या नुकसानीच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांनी ४२ दिवस साखळी उपोषण केले. यादरम्यान खासदार अशोक नेते यांनी त्या उपोषण करते शेतकऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करत नुकसान भरपाईसाठी, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना दुरध्वनी व्दारे कळविण्यात आले.त्या अनुषंगाने सरकारकडे पाठपुरावा करीत असून मदत नक्की मिळेल असे आश्वासन दिले होते. त्यानंतर शोभाताई फडणविस यांनीही प्रकल्पग्रस्तांची भेट घेऊन लवकरच मदत मिळेल असे सांगत उपोषण सोडविले. अखेर महाराष्ट्रासोबत तेलंगणा सरकारनेही नुकसानभरपाई देण्याचे मान्य केले.
१२८ हेक्टरवरील पीक आणि शेतजमीन खरडून गेल्यामुळे एकूण ३७ कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्यातील ११ कोटी तेलंगणा सरकार देणार असून २६ कोटीची भरपाई महाराष्ट्र सरकार देणार आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या नावे धनादेश बनविण्याचे काम सुरू असून येत्या १५ जून रोजी सिरोंचा तहसील कार्यालयात सर्वांना धनादेशाचे वाटप केले जाणार असल्याची माहिती खासदार अशोक नेते यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली. या कार्यक्रमाला भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह सर्व संबंधित शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांच्याकडून करण्यात आले.

Previous articleकृषी चिकित्सालयाची इमारत असून सुद्धा शेलापुर येथील मंडळ कृषी अधिकारी कार्यालय स्थलांतरित
Next articleमोदी -9 महा जनसंपर्क अभियान निमित्याने भाजप महिला आघाडीच्या वतीने अंगणवाडी सेविकांचा सन्मान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here