Home Breaking News २०२२ च्या खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीवर आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचा...

२०२२ च्या खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीवर आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचा बहिष्कार

41
0

२०२२ च्या खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीवर आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचा बहिष्कार

पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीवर जिल्ह्यातील खासदार व आमदारांनी घेतला आहे बहिष्काराचा निर्णय

जोपर्यंत निधी वाटपाबाबत जिल्ह्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत पुढील बैठकीवर बहिष्कार कायम राहणार

दिनांक २ मे २०२२ गडचिरोली

गडचिरोली जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथजी शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले असून जिल्ह्याच्या विकासासाठी मागण्यात येणाऱ्या आमदार खासदारांच्या निधीसंदर्भातील पत्रांना केराची टोपली दाखवून अन्याय करीत आहेत त्यामुळे जोपर्यंत आमदार खासदारांच्या पत्रांवर जिल्ह्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जात नाही तोपर्यंत पालक मंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या पुढील सर्व बैठकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीच्या खासदार आमदारांनी घेतला आहे. त्यानुसार २०२२ च्या खरीप हंगामपूर्व आढावा ऑनलाईन बैठकीस आपण बहिष्कार करीत असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

दिनांक २९ एप्रिल रोजीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीवरही भारतीय जनता पार्टीचे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते, आमदार डॉक्टर देवरावजी होळी आमदार कृष्णाजी गजबे विधानपरिषदेचे आमदार डॉक्टर रामदासजी आंबटकर यांनीही बहिष्काराची घोषणा केली होती . व जोपर्यंत आमदार खासदारांच्या पत्रांचा विचार करून जिल्ह्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार नाही तोपर्यंत पुढील सर्व बैठकावर बहिष्कार कायम राहील असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार पुढील सर्व बैठकांवर बहिष्काराची भूमिका राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली २०२२ च्या खरीप हंगामपूर्व आढावा ऑनलाईन बैठकीस आपण बहिष्कार करीत असल्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी याद्वारे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here