Home Breaking News गडचिरोली येथील रोजगार मेळाव्यात ५३ युवकांना मिळणार रोजगार भाजयुमो पुढाकारातुन रोजगार मेळावा...

गडचिरोली येथील रोजगार मेळाव्यात ५३ युवकांना मिळणार रोजगार भाजयुमो पुढाकारातुन रोजगार मेळावा खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते शिबीराचे उदघाटन

29
0

गडचिरोली येथील रोजगार मेळाव्यात ५३ युवकांना मिळणार रोजगार
भाजयुमो पुढाकारातुन रोजगार मेळावा
खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते शिबीराचे उदघाटन
गडचिरोली-
भारतीय जनता युवा मोर्चा गडचिरोली शहर गडचिरोलीच्या युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देशाने सेक्युरिटी स्किल काँऊसिल इंडिया लिमिडेट तसेच एस आय एसइंडिया लिमिडेट यांच्या माध्यमातून रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला या रोजगार मेळाव्यात ५३ युवकांना रोजगारांची संधी उपलब्ध होणार आहे.
सदर मेळावा दिनांक २७ एप्रिल ते ३ मे या काळात गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा जवान पुरष भरती पदाकरीता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे आहेत,
गडचिरोली येथे २ मे रोज सोमवारला पार पडलेल्या मेळाव्याचे उदघाटन गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकरावजी नेते यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पार्टी जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे , जिल्हा महामंत्री गोंविद सारडा भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये जिल्हा महामंत्री अनिल तिडके गडचिरोली शहर अध्यक्ष सागर कुंभरे भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष मंगेश रणदिवे व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
प्रास्तविकातुन भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये यांनी शिबीर आयोजनाबाबत माहिती दिली,
याप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी युवकांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रम संचालन अनिल तिडके तर आभार सागर कुंभरे यांनी केले.
सेक्युरिटी स्किल काँन्सिल ऑफ इंडिया आणि एस आय एस इंडिया लिमिटेड तर्फे सुरक्षा जवान पुरुष पदासाठी मेगा भरती घेण्यात येत असुन जिल्ह्यातील सहावा भरती मेळावा २ मे गडचिरोली येथे पार पडला. या मेळाव्यात जवळपास १३० युवक सहभागी होऊन त्यात ५३ युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला.
. सदर भरती ही भारतीय सुरक्षा दक्षता परिषद नवी दिल्ली यांच्या मार्फत घेण्यात आली.
कोरोना महामारी च्या संकटामुळे बेरोजगार तरुणांना नोकरी उपलब्ध करून तरुणांना सक्षम बनविण्याच्या उद्देशाने एक प्रयत्न भारतीय जनता युवा मोर्चा गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये महामंत्री भारत बावनथडे मधुकर भांडेकर अनिल तिडके अमोल गुड्डेल्लीवार संजय बारापात्रे व भाजयुमो तालुका अध्यक्ष पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे.
सहावा मेळावा येथे होऊन जवळपास १३० युवक सहभागी झाले, सहभागी झालेल्या युवकांची चाचणी होऊन ५३ युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे, निवड झालेल्या युवकांना प्रशिक्षण करिता निवड आदेश देण्यात आले असुन पुढील ट्रेनिंग करिता गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली शिबीर येथुन निवड झालेली युवक दिनांक १० मे ला हैदराबाद येथे प्रशिक्षण साठी उपस्थित राहायचे आहे.
कार्यक्रम यस्ववीतेसाठी एस आय एस कंपनीचे भर्ती अधिकारी निखिल कटरे सुपवायझर भुपेद्र ठाकुर गडचिरोली शहर अध्यक्ष सागरा कुंभरे जिल्हा महामंत्री अनिल तिडके मंगेश रणदिवे हर्षल गेडाम धनंजय सहदेवकर रविभाऊ भांडेकर गडचिरोली येथील भारतीय जनता युवा मोर्चा व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी विशेष प्रयत्न केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here