Home बुलढाणा टाळ- मृदंगाच्या गजरात, निघाली नवरदेवाची वरात….!! डी.जे. बँडला टाळून उभा केला एक...

टाळ- मृदंगाच्या गजरात, निघाली नवरदेवाची वरात….!! डी.जे. बँडला टाळून उभा केला एक नवीन आदर्श

88
0

आशाताई बच्छाव

IMG-20230613-WA0042.jpg

टाळ- मृदंगाच्या गजरात, निघाली नवरदेवाची वरात….!!
डी.जे. बँडला टाळून उभा केला एक नवीन आदर्श
मोताळा मोताळा युवा मराठा तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर
मोताळा: अलीकडच्या काळात लग्न म्हटलं की लाखो रुपयांचे बँड हजारो चे डीजे, याची क्रेझ वाढत असताना त्याला अपवाद ठरावा असा लग्न सोहळा मोताळा तालुक्यातील आव्हा गावामध्ये पार पडला. डी.जे.नाही. बँड नाही. तर चक्क वारकरी संप्रदायाच्या वारसाला जपत नवरदेवाची वरात टाळ मृदुंगाच्या गजरात शिव कीर्तनात फुगडीच्या मनमोहक आनंदात. ज्येष्ठ नागरिकांच्या भक्तीमय वातावरणात नवरदेवाची वरात काढण्यात आली ही बाब समाजात एक आदर्श निर्माण करण्याची ठरत आहे. लग्नसराईच्या काळात जिकडेतिकडे डीजे, बँड ची क्रेझ वाढत आहे. ध्वनी प्रदूषणाने प्रत्येकांना बहिरेपणाचे लक्षण आढळत आहे. त्याचबरोबर डीजे आवाजावर बंधने देखील लावण्यात आलेली असून काही प्रकरणे न्याय प्रविष्ट. आहे. असे असताना लग्न सोहळ्यात डी.जे.बँड.ची मागणी कमी होत नाही. समाजात एकीकडे चिंता तर दुसरीकडे निर्धारस्थापना अशा परिस्थितीत समाजासमोर एक मोठा प्रश्न निर्माण होत आहे त्या प्रश्नावर तोडगा करावा असा आगळावेगळा लग्न सोहळा सोमवारी ६ जून ला मोताळा तालुक्यातील आवा येथे पार पडला या लग्न सोहळ्यामध्ये वैशिष्ट टाळ- मृदंग वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी. गायनाचार्य मृदंगाचार्य आणि वयोवृद्ध लोकांच्या फुगड्या महिलांच्या टाळ्यांच्या गजरात परमेश्वराच्या नाम चिंतनात, निघालेले नवरदेवाची वरात. …!! या तालुक्यामध्ये एक आदर्श ठरली आहे मलकापूर तालुक्यातील बेलाड येथील जगन्नाथ केशव सांभारे यांचे सुपुत्र चि. गणेश जगन्नाथ संभारे व मोताळा तालुक्यातील आव्हा येथील ओंकार मधुकर घोंगडे यांची सुकन्या ची. सौ .का. निकिता ओंकार घोंगडे यांचा विवाह सोहळा आव्हा येथे पार पडला या विवाह सोहळ्याआधी नवरदेवाची टाळ मृदुंगाच्या तालात वरात काढण्यात आली संपूर्ण गावातून वरात फिरून आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे पूजन करून पुष्पहार वधू आणि वर त्यांच्याकडून अर्पण करण्यात आले नंतर हरिभक्त पारायण महाराजांच्या उपस्थितीत हा लग्न तोरा पार पडला

आजच्या काळात परिस्थिती नसून ब्लॉक कर्ज काढून व्यर्थ खर्च करत आहे तो खर्च टाळून संभारे आणि घोंगटे परिवाराकडून चालवलेल्या अशा एका आगळ्यावेगळ्या पुरोगामी चळवळीचा आदर्श घेणे गरजेचे आहे. असाच बदल यापुढे समाजात घडण्याची गरज आहे. शुभम घोंगटे युवा सेना उपजिल्हाप्रमुख

Previous articleयेवल्यातील पैठणी विणकरीला रिलायन्स फाउंडेशनने असा दिला मोठा आधार
Next articleयुवा मराठा न्युजचा मोठ्ठा दणका संग्रामपूरचे  वादग्रस्त आणि मुजोर तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांची अखेर उचलबांगडी..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here