• Home
  • 🛑 आता घरबसल्या करा आरटीओ संबंधित कामे : आरटीओच्या 18 सेवा झाल्या ऑनलाईन 🛑

🛑 आता घरबसल्या करा आरटीओ संबंधित कामे : आरटीओच्या 18 सेवा झाल्या ऑनलाईन 🛑

🛑 आता घरबसल्या करा आरटीओ संबंधित कामे : आरटीओच्या 18 सेवा झाल्या ऑनलाईन 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕कोणत्याही सरकारी कागदपत्रांसाठी नेहमीच प्रशासकीय कार्यालयांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. तर अनेकदा यासाठी जास्त खर्च देखील येतो.

मात्र आता आरटीओशी संबंधित 18 सेवा आता ऑनलाईन झाल्या आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक नवीन अधिसूचना जारी केली आहे. आरटीओला देण्यात येणाऱ्या काही सुविधा या डिजिटल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता तुम्हाला वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी आरटीओकडे जाण्याची गरज भासणार नाही.
या १८ सेवांमध्ये ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण, ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण (ज्यास ड्रायव्हिंग चाचणीची आवश्यकता नसते), डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्सचा पत्ता बदलणे आणि वाहनांचे आरसी, आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिट, परवान्यामधून वाहन श्रेणी परत करणे, तात्पुरते वाहन नोंदणी, यांसारख्या १८ सेवांचा समावेश आहे.

मात्र यासाठी तुमचे आधार कार्ड वाहन परवाना, आरसी यांच्याशी लिंक करणे आवश्यक असेल सरकारने कारचे ड्रायव्हिंग लायसन्स आणि नोंदणी प्रमाणपत्र आधार’शी जोडण्यास सांगितले आहे. यानंतर आता ‘आधार’ पडताळणीद्वारे ऑनलाईन सेवा मिळू शकतील.

सरकारच्या या पावलामुळे आरटीओमधील गर्दीतून लोकांना दिलासा मिळणार आहे. लोकांना ‘आधार’ लिंक पडताळणीसह घरी बसून बर्यच सेवा मिळू शकतील.⭕

anews Banner

Leave A Comment