Home जालना समता सैनिकांनी फुले-शाहु-आंबेडकर विचारांची लोकचळवळ उभी करावी

समता सैनिकांनी फुले-शाहु-आंबेडकर विचारांची लोकचळवळ उभी करावी

59
0

आशाताई बच्छाव

IMG-20230529-WA0072.jpg

समता सैनिकांनी फुले-शाहु-आंबेडकर
विचारांची लोकचळवळ उभी करावी
जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे नेते तथा माजी मंत्री छगन भुजबळ यांनी संपुर्ण देशासह राज्यामध्ये फुले-शाहु-आंबेडकरांचे विचार रूजविले आहे. नवतरूण पिढीने फुले-शाहु-आंबेडकर यांच्या विचारांची लोक चळवळ उभी करण्याचे अत्यंत गरज असल्याचे जालना येथे आयोजीत बैठकीमध्ये विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करतांना सांगीतले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जालना जिल्हा युवक शाखेच्या वतीने शनिवार रोजी काद्राबाद दर्गा वेस येथे संघटात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समता परिषदेचे नेते डॉ. पंडीतराज धानुरे हे होते. तर प्रमुख पाहुणे समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब करडक, ॲड. सुभाष राऊत, ज्येष्ठ नेते रवि सोनवने, राज्य प्रचारक डॉ. नागेश गवळी, प्राचार्य संतोष विरकर, प्राचार्य ज्ञानेश्वर दराडे, विभागीय अध्यक्ष आबा खोत, अनिल नाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी महात्मा ज्योतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे जिल्हा युवक अध्यक्ष डॉ. विशाल धानुरे, सुंदराव कुधळे, लक्ष्मण हरकळ यांनी शाल-पुष्पहार देवून सत्कार केला. यावेळी बोलतांना प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक म्हणाले की, महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी समाजाला जागरूक करून त्यांचे न्याय हक्क मिळून देण्यासाठी परिषदेच्या कार्यकर्त्यांचं मोठ योगदान आहे. परंतू यापुढे ओबीसी समाज हा एकवटला पाहिजे. जेणे करून समता परिषदेची  शक्ती दिसून यायला पाहिजे. नवतरूण मंडळींनी फुले-शाहु-आंबेडकरांचे विचार आत्मसात करून अंमलात आणत नाही तोपर्यंत ओबीसींना न्याय मिळणार नाही. त्यामु�

Previous articleबीआरएस पार्टीची एक महिन्यात एक लाख सदस्य नोंदणी करणार मराठवाडा समन्वयक सोमनाथ थोरात
Next articleस्वराज्य संघटनेच्या जिल्हाप्रमुखपदी विश्वभंर तिरूखे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here