Home उतर महाराष्ट्र अवकाळी पावसामुळे व गारपीट ग्रस्तांना शासनाने तातडीने मदत देण्याची अँड रविंद्र नाना...

अवकाळी पावसामुळे व गारपीट ग्रस्तांना शासनाने तातडीने मदत देण्याची अँड रविंद्र नाना पगारे यांची मागणी

125

आशाताई बच्छाव

IMG_20231129_172734.jpg

जगदिश बधान (सटाणा प्रतिनिधी) यांजकडून :- अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे करुन शेतकरी बांधवांना तातडीने भरपाई द्यावी अशी मागणी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांनी उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी साकडे घातले.

नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस, वादळी वारा व गारपीट झाल्याने शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बागलाण, निफाड, दिंडोरी, नांदगाव, चांदवड, येवला, मनमाड, कळवण व मालेगाव या तालुक्यांत मोठे नुकसान झाले आहे. शेतपिके त्यात प्रामुख्याने द्राक्ष, डाळींब व फळबागा, तसेच कांदा, टोमॅटो, गहू, हरभरा, ऊस, भात, भाजीपाला आदी पिकांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल्याने शेतकरी हतबल झालेले आहेत. नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागावर मोठे अस्मानी संकट ओढावले असल्याने या भागांचे युद्धपातळीवर पंचनामे करुन आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी देखील नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांनी उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे.

फोटो ओळी – गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देवून दिलासा द्यावा या मागणीचे निवेदन नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांना देतांना जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार.

Previous articleशेवगाव खंडोबा नगर येथे ११ डिसेंबर पासून अखंड हरिनाम सप्ताहास होणार आरंभ—-
Next articleस्त्री शिक्षणाचे प्रणेते म्हणजे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले:- राहुल डोंगरे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.