Home जालना बीआरएस पार्टीची एक महिन्यात एक लाख सदस्य नोंदणी करणार मराठवाडा समन्वयक सोमनाथ...

बीआरएस पार्टीची एक महिन्यात एक लाख सदस्य नोंदणी करणार मराठवाडा समन्वयक सोमनाथ थोरात

61
0

आशाताई बच्छाव

IMG-20230529-WA0073.jpg

बीआरएस पार्टीची एक महिन्यात एक लाख सदस्य नोंदणी करणार
मराठवाडा समन्वयक सोमनाथ थोरात
जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- : जालना येथे भारत राष्ट्र समितीच्या वतीने जालना जिल्ह्यात एक
महिन्यात एक लाख सदस्य नोंदणी करणार असल्याचा विश्वास मराठवाडा समन्वयक
सोमनाथ थोरात व्यक्त केला.
जालना येथे आज शासकीय विश्रामगृहात बीआरएस पक्षाच्या सभासद नोंदणी आढावा
बैठक मराठवाडा समन्वयक सोमनाथ थोरात  यांच्या उपस्थिती बैठक घेण्यात आली.
यावेळी जिल्हाप्रमुख प्रविण फुके-पाटील,विधानसभा जालना समन्वयक अशोक
अंभोरे, बदनापूर विधानसभा समन्वयक राजू वायाळ, भोकरदनचे विधानसभा शिवाजी
इंगळे, सहदेव बनकर, परतुर विधानसभा समन्वयक प्रल्हाद सोळंके, घनसावंगी
विधानसभा समन्वयक संजय सोळंके, शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते आप्पासाहेब
कदम,श्याम शिरसाट, सुभाष आधूडे. माऊली काकडे, महादेव घुले,बबन गवारे,
दीपक वर्शील, किशोर शेजुळ, पाडोले, राठोड व कार्यकर्ते व पदाधिकारी
उपस्थित होते.
यावेळी मराठवाडा समन्वयक म्हणाले की, संपुर्ण महाराष्ट्रामध्ये भारत
राष्ट्र समितीच्या पक्षाच्या वतीने २८८ विधानसभा मतदार संघामध्ये पक्षाचे
ध्येय धोरणे, पक्षाने तेलंगना राज्यामध्ये जनकल्याण, कृषी कल्याणाचे
मॉडेल जे राबविले आहे अनेक जन कल्याणाच्या योजना राबविल्या आहेत. या
योजनांची माहिती गावो-गावात देणे, आणि माहिती दिल्यानंतर प्रत्येक
गावामधून पक्षाची सभासद नोंदणी करणे या हेतून संपुर्ण महाराष्ट्रात काम
चालू झाले आहे. संपुर्णपणे एक महिन्याभर ही एक मिशन म्हणून काम केले
जाणार आहे. जालना जिल्ह्यात जे काम चालू ते खुप समाधानकारक आहे.  एक
महिन्यात एक लाख सभासद नोंदणीचे काम पुर्ण होईल, असा विश्वासही मराठवाडा
समन्वयक सोमनाथ थोरात यांनी व्यक्त केला.

Previous articleकॅम्प भागातील १२ उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार..!
Next articleसमता सैनिकांनी फुले-शाहु-आंबेडकर विचारांची लोकचळवळ उभी करावी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here