Home कोरोना ब्रेकिंग महापालिकेचे कामकाज पूर्ववत

महापालिकेचे कामकाज पूर्ववत

448
0

⭕महापालिकेचे कामकाज पूर्ववत⭕
पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पिंपरी-चिंचवड शहराला रेड झोनमधून वगळ्यात आल्याने महापालिकेत शंभर टक्के कर्मचारी कामवार येऊ लागले आहेत. त्यामुळे महापालिकेचे कामकाज सुरळीत होऊ लागले आहे. आवश्यकतेनुसार सकाळी ८ ते रात्री ८ वेळेमध्ये कार्यालय चालू ठेवण्यात येणार आहे. महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये नागरिकांना दुपारी दोन ते सायंकाळी सहा या वेळेतच प्रवेश दिला जावा, असा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे.

लॉकडाउनच्या कालावधीत पालिकेत फक्त पाच टक्के कर्मचारी – अधिकारी येत होते. राज्य सरकारने १९ मे रोजी शहराला रेड झोनमधून वगळले आहे. त्यामुळे महापालिकेत शंभर टक्के उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश आले आहेत. सुरक्षित वावराचे नियम पाळून हे कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा, शिफ्ट ड्युटीमधील कर्मचाऱ्यांच्या कामाकाजाच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

ज्या कर्मचाऱ्यांकडे नागरिकांशी संबंधित कामकाज आहे, अशा कर्मचाऱ्यांनी वेळेवर कामावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. ज्या विभागप्रमुखांकडे नागरिकांशी संबंधित कामकाज आहे, त्यांनी विभागाकडे येणाऱ्या नागरिकांची कामे मुदतीत व प्राधान्याने करावीत. तातडीचे अपवादात्मक कारण वगळता कोणाच्याही रजा मंजूर करू नयेत, विभागप्रमुखांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये. जे कर्मचारी मुख्यालय सोडून बाहेरगावी गेले असतील. त्यांना विभागप्रमुखांनी त्वरित कर्तव्यावर हजर राहण्याच्या लेखी सूचना द्याव्यात. त्यानंतरही जे कर्मचारी हजर राहणार नाहीत. त्यांच्यावर कारवाई करावी. तपासणी पथकामार्फत केलेल्या तपासणीत अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आयुक्तांनी दिलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Previous articleकरोना: पुण्यात २४ तासांत ११ मृत्यू; १६३ नवे रुग्ण, १८४ करोनामुक्त
Next articleखोटी माहिती पसरविल्याने पोलिसांत गुन्हा दाखल
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here