Home पुणे पुणे लोकसभा पोटनिवडणूक होणार का?, अजित पवार म्हणाले- ‘ बहुतेक पुण्याची पोटनिवडणूक

पुणे लोकसभा पोटनिवडणूक होणार का?, अजित पवार म्हणाले- ‘ बहुतेक पुण्याची पोटनिवडणूक

114
0

आशाताई बच्छाव

IMG-20230527-WA0033.jpg

पुणे लोकसभा पोटनिवडणूक होणार का?, अजित पवार म्हणाले- ‘ बहुतेक पुण्याची पोटनिवडणूक

पुणे :ब्युरो चिफ. उमेश पाटील
– भाजपचे दिवंगत नेते खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची तयारी सुरु केल्यामुळे पुण्याची पोटनिवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरु आहे. या निवडणुकी संदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाकीत केलं आहे. पुणे टिंबर मार्केट येथे लागलेल्या आगीच्या ठिकाणी भेट दिल्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी टिंबर मार्केट अग्नितांडव घातपात असेल तर चौकशी व्हावी अशी मागणी केली.
अजित पवार म्हणाले, मला असं वाटत होतं की पुण्याची पोटनिवडणूक लागणार नाही. पण, आता बहुतेक पुण्याची पोटनिवडणूक लागणार आहे. मला वाटत होतं की एक वर्ष लोकसभा निवडणुकीला राहिले आहेत. त्यामुळे पोटनिवडणूक लागणार नाही. पण आता निवडणूक लागू शकते.
अजित पवार पुढे म्हणाले, आज इतर पक्षाच्या तुलनेत राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. रवींद्र धंगेकरांना निवडून आणण्यासाठी सर्व पक्षांनी मदत केली. जिथ निवडणूक लागेल तिथे ज्यांची ताकद जास्त आहे, त्यांना उमेदवारी मिळावी, असंही अजित पवार यांनी म्हटले.
दरम्यान, पुणे जिल्हा निवडणूक विभागाकडून पोटनिवडणुकीची
तयारी पूर्ण झाली आहे. जिल्हा निवडणूक आयोगाने 17 दिवसांपूर्वी
तयारीला सुरुवात केली आहे. मतदार याद्या अद्यावत करणे, मतदान केंद्राचे स्थान निश्चित करण्याची कामे
पूर्ण झाली आहेत. कर्नाटक निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर 4220
ईव्हीएम मशीन आणि 5070 व्हीव्हीपॅट मशीन बंगळुरुहून पुण्यात
पाठवण्यात आल्या आहेत. या मशिन्सची सेटिंग आणि चेकिंग करण्यासाठी 30 इंजिनियर्सची नियुक्ती करण्यात
आली होती. बुधवारी (दि.24) या मशिन्सच्या सेटिंग आणि चेकिंगची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
या मशिनवर पुणे बाय इलेक्शन असे स्टिकर्स लावण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here