Home गडचिरोली सिरोंचा,आलापल्ली,आष्टी मार्गात झालेल्या रस्त्याच्या दयनीय अवस्थे बाबत खा.अशोकजी नेते यांनी घेतली दखल

सिरोंचा,आलापल्ली,आष्टी मार्गात झालेल्या रस्त्याच्या दयनीय अवस्थे बाबत खा.अशोकजी नेते यांनी घेतली दखल

68
0

आशाताई बच्छाव

IMG-20220824-WA0036.jpg

सिरोंचा,आलापल्ली,आष्टी मार्गात झालेल्या रस्त्याच्या दयनीय अवस्थे बाबत खा.अशोकजी नेते यांनी घेतली दखल                                                              गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

मा.ना.सुधिरभाऊ मुनगंटीवार मंत्री,वनेमंत्री,सांस्कृतिक कार्य,मत्स्यविभाग,म.रा.यांच्या प्रयत्नाने….. सिरोंचा,आलापल्ली,आष्टी,ह्या रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार

सिरोंचा,आलापल्ली,आष्टी रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार…..

सिरोंचा,आलापल्ली,आष्टी या मार्गाच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्थेची दखल घेत खा.अशोकजी नेते यांनी भामरागडचा केलेला दौरा प्रसंगी संबंधित विभागीय अधिकाऱ्यांचा आढावा उपविभागीय अधिकारी भामरागड तसेच आलापल्ली येथील विश्रामगृहामध्ये आढावा घेण्यात आला.याप्रसंगी सिरोंचा,आलापल्ली,आष्टी रस्ता दुरुस्ती करण्यासाठी रस्त्याचा रोड टेंडर झालेला आहे परंतु काम सुरू करण्यासाठी वनविभागाची अडचणी निर्माण होत असल्याने या क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांनी याबाबत महाराष्ट्र राज्याचे वनेमंत्री मा. श्री.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांच्याशी चर्चा करून या संबंधित संपूर्ण माहितीचा आढावा दिल्यानंतर यासंबंधीत रस्त्यांबाबत सिरोंचा,आलापल्ली,आष्टी या मार्गाच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे कामे लवकरच मार्गी लागणार असे मा. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी आश्वासन दिले.
सततच्या संतधार पावसाने व पुराच्या पाण्याने तसेच सुरजागड प्रकल्पाच्या जड वाहतुकीमुळे रस्त्यावर खुप मोठे मोठे खड्डे पडल्याने अपघात होने नाकारता येत नाही.या रोडसंबंधी लवकरच प्रश्न मार्गी लावून रोड दुरूस्तीचे काम चालु केल्या जाईल असे खा.अशोकजी नेते यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here