Home गडचिरोली राज्‍यातील मच्‍छीमार, मत्‍स्‍यसंवर्धक व मत्‍स्‍यव्‍यवसाय सहकारी संस्‍थांना तलाव ठेका रक्‍कम भरण्‍यास मुदतवाढ...

राज्‍यातील मच्‍छीमार, मत्‍स्‍यसंवर्धक व मत्‍स्‍यव्‍यवसाय सहकारी संस्‍थांना तलाव ठेका रक्‍कम भरण्‍यास मुदतवाढ देण्‍याचा मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय.

42
0

आशाताई बच्छाव

IMG-20220824-WA0034.jpg

राज्‍यातील मच्‍छीमार, मत्‍स्‍यसंवर्धक व मत्‍स्‍यव्‍यवसाय सहकारी संस्‍थांना तलाव ठेका रक्‍कम भरण्‍यास मुदतवाढ देण्‍याचा मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय.                                       गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

राज्‍यातील मच्‍छीमार, मत्‍स्‍यसंवर्धक व मत्‍स्‍यव्‍यवसाय सहकारी संस्‍थांना क्षमतेनुसार मासेमारी करता न आल्‍याने सन २०२१-२२ या वर्षाची तलाव ठेका रक्‍कम भरण्‍यास मुदतवाढ देण्‍याचा निर्णय मत्‍स्‍य व्‍यवसाय मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे.

कोरोना संसर्गाच्‍या दुस-या लाटेच्‍या पार्श्‍वभूमीवर राज्‍यात घोषित लॉकडाऊनमुळे मासेमारी करता न आल्‍याने तसेच उत्‍पादीत मासळीची विक्री करण्‍यास पुरेसा वाव न मिळाल्‍यामुळे त्‍यांना आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत असल्‍याने राज्‍यातील मच्‍छीमार सहकारी संस्‍थांनी केलेली विनंती विचारात घेवून मच्‍छीमारांना आार्थिक दिलासा देण्‍याच्‍या दृष्‍टीने राज्‍यातील मासेमारीकरिता ठेक्‍याने देण्‍यात आलेल्‍या तलाव तसेच जलाशयांची सन २०२१-२२ ची वार्षीक तलाव ठेका रक्‍कमेचा भरणा करण्‍यास दिनांक ३१ जुलै २०२२ पासून पुढे २०२१-२२ ची तलाव ठेका माफी प्रस्‍ताव मंत्री मंडळासमोर सादर होईपर्यंत मुदतवाढ देण्‍याचे निर्देश मत्‍स्‍य व्‍यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. या मुदतवाढीचा लाभ राज्‍यातील १३७३ मच्‍छीमार सहकारी संस्‍थांना तसेच ४२० खाजगी ठेकेदारांना होणार आहे.

Previous articleसिरोंचा,आलापल्ली,आष्टी मार्गात झालेल्या रस्त्याच्या दयनीय अवस्थे बाबत खा.अशोकजी नेते यांनी घेतली दखल
Next articleसौ.बिनारानी देवरावजी होळी यांचे हस्ते नेताजी कप फुटबॉल प्रतियोगितेचे बक्षीस वितरण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here