Home नाशिक वारकरी मंच महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुखपदी रामभाऊ आवारे यांची निवड

वारकरी मंच महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुखपदी रामभाऊ आवारे यांची निवड

92
0

आशाताई बच्छाव

IMG-20230527-WA0034.jpg

वारकरी मंच महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुखपदी रामभाऊ आवारे यांची निवड

वारकरी मंचने दिली दुहेरी जबाबदारी—

दैनिक युवा मराठा
निफाड रामभाऊ आवारे

अध्यात्मिक विठ्ठल रखुमाई विचार मंचचे मुख्य संचालक तथा स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष , निफाड विशेष प्रतिनिधी रामभाऊ विठ्ठलराव आवारे (वनसगाव) यांच्या अध्यात्मिक कार्याच्या व वारकरी संप्रदायाच्या प्रचार प्रसाराच्या उल्लेखनीय कार्याचा विचार करून वारकरी मंच महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष ह भ प निलेश महाराज कोंडे देशमुख आळंदीकर यांनी महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धीप्रमुख पदी निवड केली आहे अशी माहिती प्रदेश संघटक शरद आढाव पाटील यांनी दिली आहे.
वारकरी मंच प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून या मंचचे ते दैनिक वृत्तपत्रांच्या माध्यमातून अध्यात्मिक लेख तसेच नाथ संप्रदाय, नवनाथ भक्तिसार, शेगावीचा योगीराणा, यशोदा का नंदलाला, श्रीदेवी महात्म्य आदी आध्यात्मिक लेख मालिका सुरू असून दांडगा जनसंपर्क ,त्याचबरोबर विविध संघटनांमध्ये करत असलेले कार्य आणि सर्व बाबींची दखल घेऊन त्यांना वारकरी मंचच्या वतीने प्रदेश कार्याध्यक्ष व प्रदेश प्रसिद्धी प्रमुख या दुहेरी जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
वारकरी मंचच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचे एक स्टार प्रचारक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला असून वारकरी मंचचे महाराष्ट्रभर मजबूत संघटन व प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात वारकरी मंचचे विस्तारीकरण करणार असून वारकरी मंच संस्थापक अध्यक्ष आमचे मार्गदर्शक ह भ प निलेश महाराज कोंडे देशमुख आळंदीकर यांनी माझ्यावर दिलेली ही दुहेरी जबाबदारी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सहयोगातून सार्थकी करण्याचा माझा प्रयत्न असेल असे नियुक्तीप्रसंगी पत्रकार रामभाऊ आवारे सर वनसगाव यांनी आपले विचार व्यक्त केले आहे.
वारकरी मंचच्या दुहेरी जबाबदारी बद्दल वारकरी मंच महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष निलेश कोंडे- देशमुख (आळंदी देवाची), प्रदेश संघटक शरद आढाव, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष ह भ प मधुकर महाराज जाधव आगाशिवनगर, ब्राह्मण महासंघ विश्वस्त स्मिताताई कुलकर्णी, स्वराज्य पोलीस मित्र माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक जी कांबळे ,मुख्य महासचिव कमलेश (देवा) शेवाळे, विश्वस्त उमेश काशीकर सोलापूर, योगेश पाटील मुंबई, भरत नजन राहुरी, सौ धनश्रीताई उत्पात पंढरपूर, हारुण भाई शेख नासिक, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष प्रेममूर्ती अनिल अण्णा वाळके पाथर्डी, मा चेअरमन राजाबाबा होळकर, कृषीतज्ञ सचिन दादा होळकर,विठ्ठल रखुमाई ग्रुप मुख्य मार्गदर्शक भागवताचार्य शुभदाताई लोहार सांगली, भागवत कथाकार हभप विठोबा दादा आवारे,हभप विनायक महाराज वाघ,रामायणाचार्य हभप मिनाताई महाराज मडके गदेवाडी शेवगाव,रामायणाचार्य हभप राम महाराज उदागे श्रीरामपूर, मुख्य संचालक शंकरराव कोल्हे नैताळे, भागवताचार्य सीमाताई राजेंद्र काळे चांदवड,रत्नाताई चांदगुडे पाटील शिर्डी, प्राचार्य सी डी रोटे सर विंचूर, मुख्याध्यापक गोरखनाथ कुणगर,गवळी एन पी सर, नवनाथ माऊली बोरगुडे नैताळे अशोकराव पगार सर मनमाड, लक्ष्मणराव आवारे सर,सौ कमलताई गायकवाड म्हसरुळ,सौ मनिषा भोर कुंदेवाडी,बाबुराव पाटील सानप शिवडी, भास्कर आबा मांजरे धामोरी, साहेबराव आण्णा कुयटे आहेरगाव,नाथभक्त उमेश आप्पा चव्हाण दरसवाडी, मच्छिंद्र आवारे शिंदी,सौ ललिताताई कुयटे आहेरगाव, पुंडा बापु देशमुख, श्रावण नाना आवारे शिंदी, सौ रिनाताई सोनवणे,सौ मंगलताई सासवडे, संगिताताई तावरे,सौ रमाताई आठवले शिक्रापूर पुणे, गणेश माऊली दवंगे माहेगाव देशमुख, शंकरराव भवर,अरुण भाऊ घायाळ नैताळे आदींनी अभिनंदन केले आहे.

Previous articleपुणे लोकसभा पोटनिवडणूक होणार का?, अजित पवार म्हणाले- ‘ बहुतेक पुण्याची पोटनिवडणूक
Next articleकु.कुणाल आवारे कोळपेवाडी उच्च माध्यमिक च्या चारही शाखेत प्रथम–
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here