Home नाशिक कु.कुणाल आवारे कोळपेवाडी उच्च माध्यमिक च्या चारही शाखेत प्रथम–

कु.कुणाल आवारे कोळपेवाडी उच्च माध्यमिक च्या चारही शाखेत प्रथम–

179
0

आशाताई बच्छाव

IMG-20230527-WA0037.jpg

कु.कुणाल आवारे कोळपेवाडी उच्च माध्यमिक च्या चारही शाखेत प्रथम—

दैनिक युवा मराठा
निफाड रामभाऊ आवारे

शिरवाडे वाकद ता निफाड येथील रहिवाशी व श्री.छत्रपती शिवाजी विद्यालय, कोळपेवाडी उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी कु.कुणाल किरण आवारे याने कला, वाणिज्य, विज्ञान व किमान कौशल्य या चारही शाखेत प्रथम क्रमांक पटकावला.
विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल लागला असून आदित्य दिवाकर मोकळ (७१) प्रथम, प्रसाद बाळासाहेब चांडे (७०.८३) द्वितीय, गणेश शामराव लोहार (६५.८३) तृतीय, वाणिज्य शाखेचा १०० टक्के निकाल लागला असून तेजल अशोक खर्डे (७४.६५) प्रथम, ऋतुजा रोहिदास माळी (७२.८३) द्वितीय, आदेश देविदास ठाणगे (६९.८३) तृतीय, कला शाखेचा ८८.२३ टक्के निकाल लागला असून मुजाहिद समिर पटेल (६३.२) प्रथम, सुमित संजय अंभोरे (६२.७) द्वितीय, शुभम बाळासाहेब काकड (५९.७) तृतीय तर किमान कौशल्य शाखेचा निकाल ९१.९३ टक्के लागला असून कुणाल किरण आवारे (८०) प्रथम, सुमित नानासाहेब कदम (७०.५) द्वितीय, कुणाल दीपक पवार (६८) याने तृतीय क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य पी.बी.चौरे, अविनाश शिंदे, आप्पासाहेब आगवन, बाळासाहेब गवळी, योगेश महामिने, दुधलमल सर, दळवी सर, कविता होन, निंबाळकर मॅडम, निरगुडे सर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले आहे.

जिद्द ,साहस व चिकाटी या त्रिसूत्रीच्या बळावरच यश
@मी सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील असल्याने लहानपणापासूनच शिक्षणाची विशेष आवड असल्याने उच्च शिक्षणासाठी सकाळी ५ वाजता उठून स्वतःचे आवरून तीन किमी चासनळी फाटा गाठून तेथून १७ किमी शिक्षणासाठी प्रवास करत होतो कॉलेज सुटल्यावर चुलत्यांच्या दुपारनंतर कार गॅरेज मध्ये भावाला मदत करून यश जिद्द चिकाटी व शिकण्याची प्रबळ इच्छा या सर्वांच्या बळावर हे यश संपादन करता आले. या यशात माझे सर्व मार्गदर्शक शिक्षक त्याचप्रमाणे आई वडील यांची विशेष असे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
कुणाल आवारे- शिरवाडे वाकद

@ कुणाल हा अत्यंत हुशार व सर्व शिक्षकांचा आवडता विद्यार्थी आहे. जीवनातील खडतड प्रवास करत शिक्षणाबद्दल विशेष सूची असल्याने कुणाल हा मेहनती आहे आणि तो चांगला यश संपादन करेल असा आम्हाला विश्वास होता पण तो एम.सी.वि.सी.वर्गात प्रथम क्रमांक मिळवेल याची खात्री होती मात्र त्याने सर्व शाखांमध्ये यश मिळवले त्याबद्दल उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सर्व मार्गदर्शक शिक्षकांच्या वतीने हार्दिक अभिनंदन
योगेश महामिने–वर्गशिक्षक

Previous articleवारकरी मंच महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुखपदी रामभाऊ आवारे यांची निवड
Next articleपावसाळ्यापूर्वी विजेच्या कामांना प्राधान्याची गरज..! विद्युत खांबाना कुठे”कुठे झाडांच्या फांद्यांचा अडस
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here