Home नाशिक 75 वा “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” ,स्वातंत्र्य दिन नमन एज्युकेशन सोसायटी संचलित लिटील...

75 वा “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” ,स्वातंत्र्य दिन नमन एज्युकेशन सोसायटी संचलित लिटील स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल व रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मध्य मोठया प्रमाणात साजरा झाला

58
0

आशाताई बच्छाव

IMG-20220816-WA0032.jpg

75 वा “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” ,स्वातंत्र्य दिन नमन एज्युकेशन सोसायटी संचलित लिटील स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल व रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मध्य मोठया प्रमाणात साजरा झाला
नांदगांव प्रतिनिधी अनिल धामणे
नांदगांव शहरातील नावाजलेली स्कूल,लिटिल स्टार, रेनबो इंटरनॅशनल स्कुल या
विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय बागुल उपाध्यक्षा , सरिता बागुल ,तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रभाकर काकळीज (माजी मुख्याध्यापक), जगन्नाथ साळुंखे ,(सेवानिवृत्त शिक्षक ), बबनराव साळी (सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी), योगेश भाऊसाहेब गायकवाड ,(रायफल मॅन् नागालँड), अनिल धामणे (पत्रकार शिवसत्ता टाईम्स) ,दिपक थोरात (पालक शिक्षक समिती सदस्य)बाबासाहेब कदम (पालक शिक्षक समिती उपाध्यक्ष ) ,श्री.महेश पेवाल ,(पत्रकार दैनिक लोकरत्न) .लिटील स्टार इंग्लिश मेडीयम स्कूल मुख्याध्यापिका श्रीमती अनुराधा खांडेकर व रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सूर्यवंशी , या सर्वानी राष्ट्र ध्वजाचे पूजन करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला.आणि मार्च पास्ट करून ध्वजाला सलामी देण्यात आली.त्यानंतर लगेचच समुहगायन करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या शानदार भाषणांनी कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली . चिमुकल्यांनी देशभक्ती पर गितावर ताल धरत नृत्याविष्कार केला.संसथेचेअध्यक्ष, संजय बागुल उपाध्यक्षा सरीता बागुल यांच्या हस्ते सर्व मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती.अनिता जगधने यांनी केले.संस्थेच्या वतीने उपस्थितांचे आभार मानले आणि वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

हा कार्यक्रम उत्कृष्ट रीत्या पार पाडण्यात लिटील स्टार इंग्लिश मेडीयम स्कूलच्या शिक्षिका इंगोले , नूतन खैरनार , अहिरे , सोमासे , न्याहारकर, पिलके , सुरेखा गायकवाड , नेहा पाटील , ज्योती सुरसे , वर्षा नगे , संदीप पांडे ,राहुल उपाध्याय ,मोहन सुरसे तसेच
रेंनबो इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षिका जयश्री चौधरी , रूपाली शिंदे , एडना फर्नांडिस , मोनाली गायकवाड , सुषमा बावणे , रोहिणी पांडे , चैताली अहिरे तसेच डान्स टिचर आदित्य सूर्यवंशी ,म्युझिक टिचर अभिजित अहिरे ,क्रीडा शिक्षक मयुरी खैरनार आणि मदतनीस श्रीमती अनिता नेमणार, वैशाली बागुल, छाया आवारे, ज्योती सोनवणे,मंजुषा जगधने,मंगेश शिंदे, विनोद चौधरी, गजानन पवार,सागर कदम ,बाळू गायकवाड,नासिर खान पठाण,चंदू बागुल ,रवि पाटील यांनी आतोनात मेहनत घेऊन कार्यक्रम छान प्रकारे पार पडला.

Previous articleश्रीक्षेत्र पैठण येथे छावा क्रांतिवीर सेनेचे आठवे राष्ट्रीय महा अधिवेशन.
Next article३ ऑगस्ट ला देखील अपघातामागचा प्रयत्न झाला असल्याचा विनायक मेटेंच्या कार्यकर्त्याचा दावा; अपघातामागचं गूढ वाढलं!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here