आशाताई बच्छाव
सटाणा तालुक्यात मुंजवाडला राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी ठेंगोडा,(प्रतिनिधी किशोर भामरे)-मुंजवाड गावात रविवार तारीख २१/०५/२०२३ पासून कुठल्याही राजकीय लोकप्रतिनिधींनी जसे आमदार खासदार मंत्री विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी मुजवाड गावात प्रवेश करू नये केल्यास त्यांच्यावर कांदा फेकून निषेध केला जाईल असा ठराव शेतकरी क्रांती मोर्चा मुंजवाड व कांदा उत्पादक शेतकरी यांच्यावतीने करण्यात आला. आज गावाच्या चारही बाजूने राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश बंदचे फलक लावण्यात आले. सध्या परिस्थितीला शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. तसेच इतर शेतीमालाला ही भाव नाही. भारताची अर्थव्यवस्था शेतकऱ्यांच्या हातात असून शेतकऱ्यांची आज मी तिला दैना झालेली आहे. अशाच पद्धतीने महाराष्ट्रातील सर्व गावकऱ्यांनी राजकीय पुढाऱ्यांना बंदी केल्यास निष्क्रिय ठरलेले राजकीय पुढारी, प्रतिनिधी यांनी शासनाला जाब विचारला पाहिजे. असे मत शेतकरी क्रांती मोर्चा मुंजवाड चे प्रतिनिधी श्री. केशव सूर्यवंशी यांनी केले. यावेळी मुंजवाड गावातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी व शेतकरी क्रांती मोर्चा चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.L