Home बुलढाणा दिलीप मानकर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा.- तामगाव पोस्टे ला...

दिलीप मानकर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा.- तामगाव पोस्टे ला तक्रार.

81
0

आशाताई बच्छाव

IMG-20230525-WA0078.jpg

दिलीप मानकर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा.- तामगाव पोस्टे ला तक्रार.

अखेर अवैद्य रेती तस्करांची तक्रार करणाऱ्या ला करावी लागली आत्महत्या.

बुलढाणा,(स्वप्नील देशमुख ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) – संग्रामपूर शहरातील रहिवासी दिलीप रामभाऊ मानकर यांनी आज दिनांक 25 मे 2023 रोजी रेतीमाफीयांन कडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याबाबत त्यांच्या पत्नीने पोलीस स्टेशन तामगाव येथे गैरअर्जदार क्रमांक (१)शिवा मनोहर राजनकार व इतर विरुद्ध दिलेल्या तक्रारीत असे नमूद केले आहे की वरील गैरअर्जदार यांनी माझे पती दिलीप रामभाऊ मानकर यांना मारहाण करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले तसेच याआधी दिनांक 15 मार्च 2023 रोजी वरील गैरअर्जदार यांच्या विरोधात मा. जिल्हाधिकारी बुलढाणा यांना अवैद्य रेती थांबविणे बाबत निवेदन दिले होते. तसेच त्याआधी सुद्धा वेळोवेळी तहसील कार्यालय संग्रामपूर व महसूल विभागाला लेखी निवेदने तसेच तक्रारी दिलेल्या आहेत त्यामुळे अवैद्य रेती वाहतूक करणारे शिवा राजनकर व इतर यांच्यासह वारंवार माझे पती यांना घरी येऊन तसेच फोनवर सुद्धा जिवे मारण्याच्या धमक्या देत होते, तसेच तहसीलदार व महसुली विभाग हे शिवा राजनकर यांच्यासोबत असून त्यांच्या अवैद्य धंद्यावर कुठलीही कार्यवाही होणार नाही असे सुद्धा माझे पती यांना म्हणत होते. असे असताना दिनांक 23 में 2023 रोजी दुपारी 2 ते 5 वा. च्या दरम्यान वरिल सर्व गैरअर्जदार हे माझ्या घरी आले व माझ्या पतीची विचारणा करु लागले. त्यामुळे मी त्यांना सांगीतले की, माझे पती बाहेर गेले आहे, तेव्हा गैरअर्जदार यांनी म्हटले की, कुठे गेला तो. त्याला आता जिवाने मारून टाकतो असे म्हणुन घरुन निघुन गेले, त्यानंतर संग्रामपुर पंचायत समिती चौकात तक्रारदार यांच्या पतीला मारहाण करण्यात आली. नंतर पंचायत चौकातुन माझ्या पतीला दुचाकीवर बसवुन सचिन वेल्डींग वर्कस् येथे नेण्यात आले व तेथे सुध्दा माझ्या पतीला गैरअर्जदार यांनी त्याच दिवशी सचिन वेल्डिंग वर्क संग्रामपुर येथे प्रचंड मारहाण केली सदर घटणेच्या वेळी मी व माझे देर संतोष मानकर हे हजर होते, तेव्हा आम्ही तेथे आवरा आवर केली तेव्हा आम्हाला सुध्दा वरिल गैरअर्जदार यांनी कुटुंबासह जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच गैरअर्जदार क्र. 8 ही माझे पती यांना विनभंगाच्या तसेच अॕक्ट्रासीटीच्या खोटया केसेस मध्ये अडकविण्याच्या धमकी देत होती, सदर घटणेची तक्रार देण्यासाठी माझे पती पो.स्टे. तामगांव येथे गेले होते परंतु पोलीसांनी माझ्या पतीची तक्रार घेतली नाही.या व अशा प्रकारच्या नेहमीच्या धमक्यांमुळे तसेच मारहाणीमुळे माझे पतीला मानसीक धक्का बसला होता व ते गैरअर्जदार यांच्या दबावदडपणात राहत होते. त्यामुळे वरिल सर्व गैरअर्जदार यांच्या जाचाला कंटाळुन माझे पतीने आज दिनांक 25/05/2023 रोजी गळफास घेवुन आत्महत्या केली, तरी माझ्या पतीच्या आत्महत्येस वरिल सर्व गैरअर्जदार हे जबाबदार आहेत. त्यामुळे गैरअर्जदार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे व मला न्याय देण्यात यावा. असे मयत दिलीप मानकर यांच्या पत्नी मंगला मानकर यांनी पोलीस स्टेशन तामगाव येथे लेखी तक्रार दिली असून या तक्रारीवरून पोस्टे तामकांकडून काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

वेळीच मयत दिलीप मानकर यांनी आधी दिलेल्या तक्रारीवर महसूल विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन रेतीमाफीयांच्या मुचक्या आवळल्या असत्या तर अवैद्य रेती तस्कर शिवा राजनकर व त्यांना सहकार्य करणाऱ्या महसूल विभागांच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला ब्रेक लावून तक्रारदार यांना आत्महत्या करावी लागली नसती. असे 15 मार्च 2023 रोजी दिलीप मानकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिसून येते.

Previous articleआर टी ई प्रवेशा अंतर्गत होणारी बोगस ॲडमिशन थांबवा सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांच्या कडे तक्रार
Next articleसटाणा तालुक्यात मुंजवाडला राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी       
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here