Home नाशिक शिवाच्या नामस्मरणाने काम, क्रोधादी विकार नाहीसे होऊन भक्तास परम सुखाची प्राप्ती होते-

शिवाच्या नामस्मरणाने काम, क्रोधादी विकार नाहीसे होऊन भक्तास परम सुखाची प्राप्ती होते-

90
0

आशाताई बच्छाव

IMG-20230524-WA0024.jpg

शिवाच्या नामस्मरणाने काम, क्रोधादी विकार नाहीसे होऊन भक्तास परम सुखाची प्राप्ती होते-

महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज

भाऊसाहेब नगर येथील शिवमहापुराण कथेत महाराजांचे प्रतिपादन –

दैनिक युवा मराठा
निफाड (रामभाऊ आवारे)

भाऊसाहेब नगर ता. निफाड येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमात भव्य जपानूष्ठान सोहळ्यास मोठ्या भक्ती भावाने प्रारंभ झाला असून हा सोहळा रविवार दिनांक २८ मे पर्यंत चालणार आहे. या सोहळ्या अंतर्गत लघुरुद्रयाग (यज्ञ) ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सकाळी ८ ते ११ या वेळेत ह.भ.प. प्रशांत महाराज रायते यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळी ६ ते ७ या वेळेत नित्य नियम विधी, आरती, हरिपाठ व रात्री २५ मे पर्यंत रात्री ८ ते १० या वेळेत राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांचे कृपापात्र शिष्य महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज शिवमहापुराण कथेचे प्रसादिक व रसाळ वाणीत विविध दृष्टांत, दाखले देऊन निरूपण करीत आहेत. शिवाच्या नित्य नामस्मरणाने काम क्रोधादी विकार नाहीसे होऊन भक्तास परम सुखाची प्राप्ती होते. शिवशंकर भगवान भोळे दैवत असून भक्ताने, साधकाने श्रद्धायुक्त अंतकरणाने ओम नमः शिवाय मंत्राचा जप केल्यास भक्ताची कळीकाळाची भीती नाहीशी होऊन धर्म, अर्थ, काम, मोक्ष या पुरुषार्थांची प्राप्ती होते. अशा आशयाचे प्रतिपादन महामंडलेश्वर शिवगिरी महाराजांनी कथेच्या प्रथम दिनी केले. दिवसेंदिवस कथा श्रावणासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. तसेच ख्यातनाम गायक ईश्वर कुशारे, त्रंबक मेदने हे गायन साथ करीत असून, विठ्ठल गाडे हे तबल्याची तर मंगेश राजगुरू ऑर्गनची साथ करीत आहेत, तर दीपक बकरे ढोलकची साथ करीत आहेत. शुक्रवार दिनांक २६ मे रोजी रात्री ९ ते ११ या वेळेत ख्यातनाम कीर्तनकार ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन होणार आहे.
शनिवार दिनांक २७ मे रोजी रात्री ९ ते ११ या वेळेत परमपूज्य स्वामी माधव गिरीजी महाराज यांचे प्रवचन होणार आहे. रविवार दिनांक २८ मे रोजी सकाळी १०.०० वाजता जपानुष्ठान सांगता यज्ञ पूर्णाहुती होऊन उपस्थित साधुसंतांची प्रवचने होऊन महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे. भाविकांनी जपानुष्ठान, शिवमहापुराण कथा, कीर्तन, प्रवचन ज्ञानेश्वरी पारायण आधी धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज व जनार्दन स्वामी भक्त मंडळाने केली आहे.

Previous articleराज्यस्तरीय स्वराज्य रक्षक उद्योग रत्न पुरस्काराने सोलापूर च्या सौ अनिता कुलकर्णी सन्मानित
Next articleअंबुलगा बु. येथील साल गड्याच्या मुलीची पोलीस शिपाई पदी निवड.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here