Home नाशिक राज्यस्तरीय स्वराज्य रक्षक उद्योग रत्न पुरस्काराने सोलापूर च्या सौ अनिता कुलकर्णी सन्मानित

राज्यस्तरीय स्वराज्य रक्षक उद्योग रत्न पुरस्काराने सोलापूर च्या सौ अनिता कुलकर्णी सन्मानित

282
0

आशाताई बच्छाव

IMG-20230524-WA0023.jpg

राज्यस्तरीय स्वराज्य रक्षक उद्योग रत्न पुरस्काराने सोलापूर च्या सौ अनिता कुलकर्णी सन्मानित

निफाड रामभाऊ आवारे

भारत सरकार मान्यता प्राप्त स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने समाजाच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव व्हावा त्यांना प्रेरणा मिळावी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून स्वराज्य रक्षणाची जबाबदारी जरी प्रत्येकाची असली तरी त्यासाठी चांगल्या प्रकारे काम करता यावे ही मापक अपेक्षा बाळगून दरवर्षी स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा स्वराज्य रक्षक पुरस्कार देऊन गौरविले जाते. सोलापूर येथील सौ अनिता अनिल कुलकर्णी यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन स्वराज्य संघटनेच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय स्वराज्य रक्षक उद्योग रत्न पुरस्कार २०२२-२०२३ हा पुरस्कार प्रदान सोहळा कोल्हापूर येथे पार पडला या साठी प्रमूख पाहुणे म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कोल्हापूर जिल्हा प्रमुख श्री. संजय पवार उपस्थीत होते. या पुरस्कार सोहळ्यासाठी आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदचे कोल्हापूरचे कार्याध्यक्ष प्रदीप अष्टेकर, पंकज अष्टेकर, माधवी पतकी, धनश्री कुलकर्णी, चित्रा कुंभोजकर, लता कुलकर्णी, हेमा जोशी उपस्थीत होते.अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक जी कांबळे व संघटनेचे राष्ट्रीय महासचिव कमलेश (देवा) शेवाळे यांनी दिली आहे.
सौ.अनिता अनिल कुलकर्णी या मूळ कोल्हापूर गावच्या माहेरची परिस्थिती अनुकूल होती वडील शिक्षक,आई गृहिणी,दोन भाऊ आणि एक बहिण असा मोठा परिवार. 1979 साली लग्न होऊन त्या सोलापूर ला आल्या आणि त्यानंतर त्या कुलकर्णी मसाले या व्यवसायात एकसंघ झाल्या.ते आजतागायत अनेक कठीण प्रसंगांना तोंड देत आज त्या टीम लीडर प्रमाणे सगळ्यांना एकत्रित घेऊन काम करतच आहेत.त्यातून अनेकांचे संसार त्यांनी फुलवले आहेत.कोरोना सारख्या कठीण परिस्थितीला तोंड देत अनेक संकटे झेलून कामगारांना घरी बसण्याची वेळ आली पणं त्यांना घरी नुसतं न बसू देता त्यांच्या हाताला काम कसे मिळेल हे अनिता कुलकर्णी यांनी जातीने पाहिलं आणि त्यांना काम दिलं.आज किमान वीस एक कामगार काकूंच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहेत.त्या सगळ्यांना सौ.अनिता कुलकर्णी यांनी मोलाचं सहकार्य केलं.म्हणूनच कुलकर्णी मसाले, सोलापूर यांची चौथी पिढी हा व्यवसाय यशस्वीपणे पुढे नेत आहे.
या पुरस्काराबद्दल स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटना संस्थापक अध्यक्ष दीपक जी कांबळे व संघटनेचे मुख्य महासचिव कमलेश देवा शेवाळे
सौ धनश्रीताई उत्पात विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य महिला राज्य संपर्क प्रमुख, विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य समन्वयक,भरत नजन,विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य प्रसिद्धीप्रमुख उमेश काशीकर, विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य सचिव योगेश पाटील, आणि विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य सरचिटणीस हारुनभाई शेख, वारकरी मंच महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा स्वराज्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रामभाऊ आवारे सर,संचालक तथा मुंबई विभाग सचिव सौ सविता तावरे, संचालक तथा पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस सौ मंजुषा डोईफोडे,संचालक तथा पुणे जिल्हा महिला अध्यक्ष सौ संगीता बोराडे, संचालक तथा उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस योगेश ददंणे ,संचालक तथा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रशांत निकम, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संतोष जावळे आदींनी अभिनंदन केले आहे.

@ स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेने केलेल्या कामाची दखल घेऊन पुरस्कार दिला या मुळे जबाबदारी वाढली असून काम आणखी जोमाने करायला उत्साह मिळाला आहे.

सौ अनिता अनिल कुलकर्णी (पुरस्कारार्थी) सोलापूर

Previous articleजागतिक मधुमक्षिका दिनानिमित्त जनजागृती मेळावा
Next articleशिवाच्या नामस्मरणाने काम, क्रोधादी विकार नाहीसे होऊन भक्तास परम सुखाची प्राप्ती होते-
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here