Home गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमटी, गडचिरोली च्या वतीने मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा.

जिल्हा काँग्रेस कमटी, गडचिरोली च्या वतीने मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा.

78
0

आशाताई बच्छाव

IMG-20220816-WA0052.jpg

जिल्हा काँग्रेस कमटी, गडचिरोली च्या वतीने मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भर पावसात निघाली आझादी गौरव पदयात्रा

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)://  भारत देशाला स्वातंत्र्य मिळून या वर्षी 75 वर्षे पूर्ण झाली. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व नंतर स्वातंत्र्योत्तर राष्ट्र उभारणीत अनेक काँग्रेस नेत्यांची मोठी भूमिका होती. अनेक काँग्रेस नेते या लढ्यात शहीद झाले. अश्या या महान क्रांतिकारकांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अभिवादन करण्याकरिता व स्वातंत्र्योउत्सव साजरा करण्या करिता जिल्हा काँग्रेस च्या वतीने 9  ऑगस्ट पासून 15 ऑगस्ट पर्यंत जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वाखाली कुरखेडा ते गडचिरोली अशी 75 km ची पदयात्रा काढण्यात आली होती.
स्वातंत्र्य दिनी जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहन पार पडले. याप्रसंगी कुरखेडा ते गडचिरोली असे सतत 7 दिवस सुरू असलेल्या आझादी गौरव पदयात्रेत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी सर्वांचे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी आभार मानले.
त्या नंतर गडचिरोली शहरातून भजन दिंडी, देशभक्ती गीताच्या स्वरात  जिल्हा काँग्रेस च्या वतीने भव्य आझादी गौरव पदयात्रा काढण्यात आली.
यावेळी माजी खास. मारोतराव कोवासे, प्रदेश महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ.नामदेव किरसान, प्रदेश महासचिव तथा माजी आम. डॉ.नामदेव उसेंडी, प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते, प्रदेश सचिव डॉ.चंदा कोडवते, शहराध्यक्ष सतिश विधाते, माजी जि.प.उपाध्यक्ष जीवन नाट, माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, माजी जिल्हाध्यक्ष हसनअली गिलानी, प्र.सचिव भावना वानखेडे, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्वजीत कोवासे, महिला अध्यक्ष रुपाली पंदिलवार, अनुसूचित जाती अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, किसान सेल अध्यक्ष वामन सावसाकडे, शिक्षक सेल अध्यक्ष देवाजी सोनटक्के, रोजगार स्वयंम रोजगार सेल अध्यक्ष दामदेव मंडलवार, कार्याध्यक्ष पुष्पलता कुमरे, सहकार सेल अध्यक्ष शामराव चापले, अनुसूचित जाती महिला अध्यक्ष अपर्णा खेवले,  ता.काँ. अध्यक्ष नेताजी गावतुरे, जिल्हा कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, सुनील चडगुलवार, रमेश चौधरी, कुरखेडा ता.अध्यक्ष जयंत हरडे, प्रभाकर तुलावी, गिरीधर तीतराम, मिलिंद खोब्रागडे, राजेंद्र बुले, नरेंद्र गजपुरे, हरबाजी मोरे, दिवाकर निसार, वसंत राउत, ढिवरू मेश्राम, अब्दुल पंजवाणी, राकेश रत्नावार, दीपक मडके, सुनील ङोगरा, सुरेश भांडेकर, वसंत सातपुते, दिलीप आखाडे, गंधेवार साहेब, जीवन मेश्राम, महादेव भोयर, घनश्याम वाढई, जितेंद्र मुनघाटे, बाळू मडावी, माजिद स्ययद, रुपेश टिकले, सुधीर बांबोळे, रजनी आत्राम, पुष्पा कोहपरे, मंदा पेंदरे, पद्मा कोडापे, भरती कोसरे, विमल मेश्राम, कल्पना नंदेश्वर, बेबीताई कुमरे, आरती लहरी, लता मुरकुटे, अनिता डोईजड, आशा मेश्राम, नीता वडेटीवार, प्रभाकर मेडीवार, जावेद खान, रुपेश सलामे सह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी पाऊस सुरू असताना सुद्धा या ध्वजारोहन सोहळ्यास व आझादी गौरव पदयात्रेत सहभागी झाले होते.

Previous articleग्रा.प.बोरी येतील जि.प. शाळेत नवीन वर्ग खोलीच्या उदघाटन सम्पन्न
Next articleकोल्हापूरात तृतीयपंथीयाचा धिंगाणा,पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष की कानाडोळा..?
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here