Home युवा मराठा विशेष गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.

गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.

67
0

आशाताई बच्छाव

IMG-20220713-WA0001.jpg

राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघ महाराष्ट्र पुणे जिल्हाध्यक्ष, युवा मराठा न्यूज पुणे जिल्हा प्रतिनिधी श्री प्रशांत नागणे. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा….गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य…..गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती….गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य….गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाण तेचे मूर्तिमंत प्रतीक……गुरु त्यांच्याजवळील ज्ञान आणि अनुभवातून शिष्याला मार्गदर्शन करत असतात जीवन जगत असताना या ज्ञान आणि अनुभवाची प्रत्येकाला गरज असते स्वानुभवातून शिकण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीचा सल्ला घेतल्यामुळे जीवनातील समस्या लवकर सोडविता येतात आणि जीवन सुखी समाधानी होते थोडक्यात जीवनात गुरु शिवाय तरणोपाय नाही, माझ्या आयुष्यात मला जन्म देणारी आई वडील माझे प्रथम गुरुवर्य आहेत की ज्यांच्यामुळे मी या आयुष्याचा आनंद घेऊ शकलो, त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये माझ्या पावलोपावली माझ्या सुख दुःखा मध्ये साथ देणारे माझे निकटवर्तीय मित्र बंधू गुरुवर्या समान ज्यांनी आत्ता पर्यंत पावलोपावली चांगले मार्गदर्शन करून मला माझ्या हातून होणाऱ्या चुका वेळोवेळी दाखवून मला प्रत्येक संकटा मधून सहज बाहेर काढले असे श्री संजय वाघमारे त्यांचा मी मनापासून आभारी आहे त्याच बरोबर करिअरची सुरुवात केल्यानंतर युनी लिंक कंपनीमध्ये ज्यांच्या सल्ल्यामुळे ज्यांच्या आशीर्वादामुळे मी माझ्या आयुष्यातील सर्व छोटे मोठे गोल पूर्ण करू शकलो असे माझे गुरुवर्य डॉ इम्रान पटेल सर आणि श्री संतोष शिंदे सर यांचा मनःपूर्वक आभारी आहे त्याच बरोबर जीवन जगत असताना पत्रकारिता काय असते पत्रकारिता करीत असताना कोणावरती ही अन्याय ना होता न्यायाला आपण वाचा कशी फोडू शकतो याची सखोल माहिती देणारे माझे गुरुवर्य युवा मराठा न्यूज त्याच बरोबर राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघ महाराष्ट्र अध्यक्ष, त्याच बरोबर आश्रय आशा फाउंडेशन अध्यक्ष श्री राजेंद्र पाटील साहेब यांचा मी मनःपूर्वक आभारी आहे यांच्या सल्ल्याशिवाय पत्रकारितेमध्ये आमचे पानही हलू शकत नाही असे माझे गुरुवर्य त्यांना माझे कोटी कोटी नमन पत्रकारिता करीत असताना कोणतीही अडचण कोणत्याही वेळेला असो त्या ठिकाणी खंबीर सात म्हणून पाठीमागे उभे राहणारे आमचे गुरुवर्य, असे गुरुवर्य आयुष्यात मिळणं हे माझं भाग्यच प्रत्येकाच्या आयुष्यात कोणी ना कोणी गुरु असतोच आणि त्या गुरुविषयी शिष्याने कृतज्ञता आणि श्रद्धा असणे गरजेचे आहे यासाठी गुरूपौर्णिमेचे महत्त्व सर्वांना माहीत असणे गरजेचे आहे अर्थात गुरु म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश गुरु म्हणजेच ईश्वराचे दुसरे रूप असतात ज्या गुरुंनी आपले व्यक्तिमत्व घडवले त्या गुरुप्रती आदर व्यक्त करण्याचा त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन मडके बनवितो त्याचप्रमाणे गुरु मानवरूपी व्यक्तीमत्वाला आपल्या संस्कारांनी आदर्श घडवितात आपण त्यांच्या समोर नम्र होऊन ज्ञानकण वेचले पाहिजे कारण शेवटी गुरुविण कोण दाखविल वाट…….”हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा, आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा”!!

Previous articleगुरुपौर्णिमा..2022
Next articleयुवा मराठाचे मुख्य संपादक पाटील /राऊत महान गुरू आमचा आदर्श ..!!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here