Home बीड वाहनांच्या एलईडी दिव्यांमुळे अपघाताचा धोका वाढू लागला!

वाहनांच्या एलईडी दिव्यांमुळे अपघाताचा धोका वाढू लागला!

22
0

आशाताई बच्छाव

1000302529.jpg

वाहनांच्या एलईडी दिव्यांमुळे अपघाताचा धोका वाढू लागला!

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/परळी – परळी तालुक्यातील सिरसाळा गाव तालुका स्तराचे असून सध्या परळी ते बीड राष्ट्रीय महामार्गाच्या नवीन रस्त्याचे काम चालू असून सध्या परळी ते सिरसाळा रस्त्याचे सध्या स्थितीत काम चालू असल्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. आणि त्यात भर म्हणून समोर येणाऱ्या वाहनांचे हेडलाईटचे फोकस वाहन उत्पादक कंपन्यांनी दुचाकी,चारचाकी मध्ये मोटार वाहन कायद्याचे पालन करत पूर्वीच्या दिव्याऐवजी (ब) एलईडी दिवे दिले आहेत. ते पद्धतीने अप्पर किंवा डिप्पर करून वापरता येतात. मात्र त्यापेक्षा अधिक प्रखर लाईटचा हट्टहास वाहनधारकांकडून वाढत आहे. त्यामुळे वाहनांला तीव्र फोकस असलेल्या व्हाईट लाईटचे (डॅझलिंग लाईट) अतिरिक्त दिवे बसून घेत आहेत. दुचाकी, चारचाकी वाहनांमध्ये नियमबाह्य बदल करून अशा लाइट्स लावल्या जात आहेत. प्रकाशझोतामुळे समोरून येणाऱ्या वाहनामुळे वाहनचालकांचे डोळे दिल्यामुळे रस्त्याचे अर्धवट काम व पुलाचे काम लक्षात येत नाही. हे दिवे रात्रीच्या वेळी अपघाताचे कारण ठरत आहेत. वाहन उत्पादक कंपन्यांनी लावलेल्या दिव्याव्यतिरिक्त जास्त प्रखर दिवे लावणे मोटर कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. आरटीओकडून या वाहन चालकांवर नियमित दंडात्मक कार्यवाही केली जाते. दरम्यान नागरिकांनी दुचाकी, चारचाकी वाहनांना अतिरिक्त दिवे बसवू नये. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई कधी होईल अशी चर्चा नागरिकांतून ऐकावयास मिळत आहे. कंपनीने नियमानुसार दिवे लावले असतात, वाहनाचा जसा कमी जास्त वेग होईल त्यानुसार लाईट मध्ये फरक पडतो. त्यावर अधिक लाईटची गरज म्हणून या व्हाईट लाईटचे दिवे लावण्याचे प्रमाण अधिक वाढले आहेत. डोळे दिपल्यामुळे वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटते. हे दिवे बॅटरीवर चालत असल्याने वाहनाच्या वेगाचा त्यावर परिणाम होत नाही. पण त्याच्या व्यतिरिक्त अनेक जण दोन किंवा चार एलईडी डॅझलिंग लाईट लावतात. समोरून येणाऱ्या वाहनांचे डोळे दिपल्यामुळे वाहनाचे नियंत्रण सुटून अपघात होण्याची शक्यता असते. मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई होते. वाहनांचे लाईट, आरसे, रंग बदलणे म्हणजे मोटर कायद्याचे उल्लंघन करणे होय, असे बदल वाहनधारकांकडून केले जातात. नोंदणीवेळी असे प्रकार दिसल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे वाहनांची नोंदणी झाल्यावर असे बदल केले जातात.

Previous articleवनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांच्या १२८ बदली पात्र होती बदल्या; एका जिल्ह्यात अनेक जण पाच वर्षे ठाण मांडून बसले आहेत.
Next articleपोलीस अधीक्षकांचा फोटो आणि नाव वापरून सायबर भामट्याने घातला धुमाकूळ
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here