Home अमरावती वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांच्या १२८ बदली पात्र होती बदल्या; एका जिल्ह्यात अनेक जण पाच...

वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांच्या १२८ बदली पात्र होती बदल्या; एका जिल्ह्यात अनेक जण पाच वर्षे ठाण मांडून बसले आहेत.

28
0

आशाताई बच्छाव

1000302527.jpg

वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांच्या १२८ बदली पात्र होती बदल्या; एका जिल्ह्यात अनेक जण पाच वर्षे ठाण मांडून बसले आहेत.
___________
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
महाराष्ट्र राज्यातील बदली पात्र १२८ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदलीचे सूत्र मंत्रालयातून हलणार असल्याने अनेक वनात अधिकारी मंत्रालयात फिल्डिंग लावताना दिसत आहे. एकाच वेळी होणाऱ्या राज्यस्तरीय बदलांची धास्ती अनेकांनी घेतली आहे. जिल्ह्यात पाच वर्षा ठाण मांडून बसलेल्याना यावेळेस मात्र बाहेर पडावे लागेल. असे एकंदरीत चित्र आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी वन विभागातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्याचे अधिकारी वन मंत्रालयाने स्वतःकडे घेतले आहेत. त्यामुळे मुख्य वन संरक्षकांचे बदलीचे अधिकार संपुष्टात आले असून लागेबांधे ठेवत जिल्ह्यात राहणाऱ्या काही वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची गोची झालेली आहे. शासन निर्णयानुसार यापुढे सामाजिक वनीकरण, प्रादेशिक वन्यजीव, कार्य आयोजना अशी बदली प्रवास करावा लागेल. शिवाय तीन वर्षाच्या एकाच ठिकाणी थांबता येणार नाही, कारण आर एफ ओ चे पद हे राज्यस्तरीय असल्या मुळे बदल्यांचा निकष राज्यस्तरीय लावण्यात येणार आहे. ज्यामुळे जिल्हा बदल होणारा आता या निर्णयावरून स्पष्ट झालेले आहे. कारण महाराष्ट्रातील निवडणूक संपल्यानंतर प्रशासकीय धोरणात शिथिलता येऊन ३१ मे पर्यंत राज्यातील१२८ वन परीक्षक क्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदलीचा पोळा फुटणार हे निश्चित झाले आहे. याबाबत मंत्रालयात जोरदार बिल्डिंग सुरू वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची बदली यादी १५ मार्च रोजी जाहीर झाल्यानंतर अनेक अधिकारी मार्च एंडिंग नंतर सक्रिय झाले आहे. मंत्रालयात सध्या वनसचिव उत्तराखंडमध्ये प्रशिक्षणार असून ते २९ एप्रिल पासून मंत्रालयात विराजमान होणार आहेत. त्यापूर्वी राज्यातील काही आर एफ ओ आपापल्या परीने भेटीगाठी कोणी जागा मिळवायची ही सोय तयारी करण्यासाठी मंत्रालयात गाठत आहेत. राज्यातील ७५च्या वर वनपरिक्षेत्र अधिकारी मंत्रालयाच्या पायरीची दर्शन करून निघाल्याचे माहिती मिळाली आहे. गेल्या ४ वर्षापासून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्या वन प्रशासनाकडे आलेल्या आहेत. मुख्य वन संरक्षक दर्जाच्या वनाधिकाऱ्यांशी लागेबांधे असणारे आर एफ ओ जिल्ह्यात अर्धी अधिक नोकरी करत आहेत. कधी सामाजिक वनीकरण नंतर प्रादेशिक असा बदली प्रवास सध्या सुरू आहे. जिल्ह्यात राहण्याकरता लक्ष्मी दर्शन दाखविण्याची प्रथा असल्याने १२८ च्या बदली यादीत १०० त्याजवळ वनपरिक्षेत्र अधिकारी वर्ग ३ प्रमाणे बदल्या करताना दिसून येतात. बनावट कारणे आणि लाखो रुपयाची उलाढाल यामुळे अनेकांना जिल्ह्यात राहतात येथे अशी स्थिती आर एफ ओ च्या बदल्यामध्ये यास आता मात्र ब्रेक लागण्याची दाट शक्यता आहे.

Previous articleअमरावती लोकसभा निवडणुकीत आनंदराज आंबेडकर यांच्यासोबत वंचित नाही! जिल्हाध्यक्ष शैलेश गवळी यांनी धुडकावले पक्ष आदेश.
Next articleवाहनांच्या एलईडी दिव्यांमुळे अपघाताचा धोका वाढू लागला!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here