Home अमरावती अमरावती लोकसभा निवडणुकीत आनंदराज आंबेडकर यांच्यासोबत वंचित नाही! जिल्हाध्यक्ष शैलेश गवळी यांनी...

अमरावती लोकसभा निवडणुकीत आनंदराज आंबेडकर यांच्यासोबत वंचित नाही! जिल्हाध्यक्ष शैलेश गवळी यांनी धुडकावले पक्ष आदेश.

46
0

आशाताई बच्छाव

1000302525.jpg

अमरावती लोकसभा निवडणुकीत आनंदराज आंबेडकर यांच्यासोबत वंचित नाही! जिल्हाध्यक्ष शैलेश गवळी यांनी धुडकावले पक्ष आदेश.
_____________
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती लोकसभा निवडणुकीत आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा न देता वंचित चे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले की वंचित आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा न देता महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी वंचित काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंबावर निवडनुक रिंगणात उभे आहेत. अशातच रविवारी वंचितेचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवळी यांनी पत्रकार परिषद घेऊन रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी व हे वंचित यांच्या पदाधिकाऱ्यांना मानसन्मान देत नाही त्यामुळे लोकशाही बळकटीसाठी आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी काम करणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच वंचिताचे सर्वच तालुकाध्यक्षही त्यांच्यासोबत असल्याचे शैलेश गवई म्हणाले. अमरावती मधून लोकसभा निवडणूक रिंगणात असलेल्या आनंद राज आंबेडकर यांनी तीन एप्रिल रोजी वंचित पाठिंबा देत नसल्याने आपण उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे स्पष्ट केले होते. त्यांनी ४ एप्रिल त्यांना वंचितीने पाठिंबा दिल्यानंतर ७ सात एप्रिल ला आनंद आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांच्यासोबत वंचितेचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवळी देखील पत्रकार परिषद मध्ये सहभागी होते. परंतु दहा-बारा दिवसातच जिल्हाध्यक्ष शैलेश गवळी यांनी पक्ष आदेश धुडकावत आनंदराज आंबेडकर यांना महाविकास आघाडीतून निवडणूक रिंगणात असलेल्या काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. शैलेश गवई यांच्या म्हणण्यानुसार रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी हे वंचित तिच्या पदाधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा मान सन्मान देत नाही. आणि हा सर्व प्रकार आनंदराज आंबेडकर यांना अंधारात ठेवून सुरू आहे. त्यामुळे मताचे विभाजन होऊन संविधान विरोधी पक्षाला त्याचा फायदा होऊ नये, यासाठी ते काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देत त्यांच्या प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या निर्णयासोबत वंचितेचे इतरही पदाधिकारी असल्याने आनंदराज आंबेडकर सोबत वंचित नसल्याचेही ते यावेळी म्हणाले. आंबेडकरी समाज आंबेडकर घराण्यासोबतच आहे. वंचिताचे जिल्हाध्यक्ष यांची प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे मागील आठ ते दहा दिवसापासून ते तसेही प्रचार मध्ये सहभागी झालेले नाही. सायन्स कोर मैदान येथे झालेल्या सभेमध्ये ही ते कुठेच नव्हते. आणि हे आम्हाला यापूर्वीच माहिती आहे. त्यामुळे त्यांच्यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. करी समाज हा आंबेडकर घराण्यासोबत प्रामाणिक असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.

___________

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here